Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची या नाट्य माहितीपटाचा मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
Image

मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची या नाट्य माहितीपटाचा मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

प्रतिनिधी

सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती

मराठवाड्याचा मुक्ती संग्राम नव्या पिढीसमोर सचित्र यावा अशी संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती, ती आज पूर्ण झाली. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ निर्मित ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ या नाट्य माहितीपटाचा शुभारंभ मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे आज झाला. यावेळी उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार, सांस्कृतिक मंत्री श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. यावेळी या नाट्य माहितीपटाचे मान्यवरांनी कौतुक केले.

राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास मोठ्या पडद्यावर अशाप्रकारे पहिल्यादाच येत आहे. अगदी अल्प कालावधीत

कथा मराठवाड्याच्या संघर्षाची हा नाट्य माहितीपट तयार करण्यात आला आहे.

माहितीपटाची वैशिष्ट्ये

१. मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची हा डॉक्यु ड्रामा प्रकार आहे. म्हणजेच उपलब्ध कागदपत्रे आणि नाट्यरूपांतर यांची योग्य पद्धतीने सांगड घालून तयार केलेला माहितीपट.

२. शिवराज अष्टकाचे जनक, फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार या सलग ५ वर्षात ५ सुपरहिट चित्रपटाचे लेखन,दिग्दर्शन करणारे दिग्पाल लांजेकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे.

३. खालील उपलब्ध पुस्तके, संदर्भ यांचा सखोल अभ्यास करून संहिता लिहिली आहे.

सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा.

४. ब्रिटिशकालीन वृत्तवाहिन्यांवरील मूळ उपलब्ध व्हिडिओंचा अभ्यास करून त्याचा योग्य पद्धतीने वापर केला आहे.

५. अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस, विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे अशा मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलाकारांनी या माहितीपटात भूमिका साकारली आहे.

६. केवळ १२ दिवसात हा ७५ मिनिटांचा माहितीपट तयार करण्यात आला आहे.

७. सावित्री ज्योती या माहितीपटासाठी पुरस्कार प्राप्त केदार दिवेकर यांनी या माहितीपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे.

८. फत्तेशिकस्त चित्रपटासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कार प्राप्त निखिल लांजेकर यांनी या माहितीपटाचे ध्वनी आरेखन केले आहे.

९. अनेक नावाजलेल्या हिंदी मराठी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलेले प्रतीक रेडीज यांनी या माहितीपटातील नाट्यरूपांतरित भागाचे कला दिग्दर्शन केले आहे.

Releated Posts

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026