प्रतिनिधी – फिरोज भालदार
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे गायरान गटामध्ये राहत असणाऱ्या लोकांना वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत च्या वतीने अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. या नोटिसांचा खुलासा देण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडून दहा दिवसाची मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर येथील महिला व ग्रामस्थ तसेच जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने व बहुजन हक्क परिषद बारामती तालुका अध्यक्ष अमोल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे उच्च न्यायालयाने दिलेला निकालाचा आदर करून आम्ही ही गायरान गटांमध्ये गेले ५० ते ६० वर्षापासून वास्तव्य करत आहोत. याचाही कुठेतरी विचार करून आमच्या लोकांवरही अन्याय होणार नाही. याची दखल ग्रामपंचायतीने घ्यावी असे ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. हे निवेदन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच संगीता शहा, सदस्य अजित भोसले महिला सदस्या प्रेमलता रांगोळे यांनी हे निवेदन स्वीकारले . यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतचे उपसरपंच संगीता शहा यांनी निवेदन स्वीकारताना तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खबरदारी ग्रामपंचायत कार्यालय घेईल असे आश्वासन निवेदन कर्त्यांना दिले आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य अजित भोसले यांनी वडगाव निंबाळकर येथील गायरान गटांमध्ये वास्तव्यात असणाऱ्या लोकांवर अन्याय होणार नाही. ग्रामपंचायत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून या दिलेल्या निवेदनातचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करून शासन दरबारी याबाबत योग्य ती भूमिका घेऊन निवेदन कर्त्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले आहे. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा व त्याच बरोबर बहुजन हक्क परिषद बारामती तालुका यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी लता खंडाळे, कल्पना धुमाळ,अलका बागडे, लता चव्हाण ,प्रभावती रांगोळे, मंदा पवार,सफिया आतार, शबाना बागवान,कल्पना प्रसाद, मंदा खोडके,करिष्मा बागवान, प्रफुल्ल शेंडे, किसन ननवरे, नितीन शिंदे, मधुकर शिंदे, तुषार चव्हाण,बजरंग जाधव, रुपेश रांगोळे, सलमान आतार, सनी प्रसाद,उपस्थित होते .