• Home
  • क्राईम
  • विद्यार्थ्यांना मारहाणीची शिक्षा, पुरंदर तालुक्यातील दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा
Image

विद्यार्थ्यांना मारहाणीची शिक्षा, पुरंदर तालुक्यातील दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी

मारहाणीची शिक्षा करून विद्यार्थ्यांना इजा केल्याप्रकरणी पुरंदर तालुक्यातील दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणिताची वही न आणल्याचा राग आल्याने शिक्षकाने चापट मारून विद्यार्थ्याच्या कानाला इजा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सासवड येथील वाघिरे हायस्कूल येथे हा प्रकार घडला. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सासवड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणिताचे शिक्षक गणेश पाठक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. संतोष कचरे यांचा मुलगा पाचवीच्या वर्गात शिकत आहे. मंगळवारी (२३ जुलै) तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. शिक्षकांनी गणिताची वही बाकावर काढून ठेवण्यास सांगितले. मात्र, वही घरी राहिल्याचे सांगताच शिक्षकाने त्याच्या डाव्या कानाखाली चापट मारली. तेव्हापासून मुलाचा कान दुखत असून त्याला ऐकू येत नसल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कचरे यांनी सासवड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.

दिवे (ता. पुरंदर) येथील श्रीराम गुरुकुल पाठशाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका लहान बालकाला कळकाच्या काठीने पाठीवर आणि पायावर मारहाण केल्याबद्दल शिक्षक मंदार शहरकर (रा. दिवे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांना सांभाळण्याची आणि काळजी घेण्याची गरज असतानाही भांडणे करतो या कारणामुळे संबंधित मुलाला मारहाण करण्यात आली. सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

Releated Posts

तोतया पत्रकार लूट प्रकरणात अटकेत; महिला पोलीस हवालदारासह दोघे सहआरोपी

प्रतिनिधी नवले पूल परिसरात व्यावसायिकाची मोटार अडवून एक कोटी रुपयांची लूट प्रकरणात नऱ्हे पोलिसांनी तोतया पत्रकाराला अटक केली.…

ByBymnewsmarathi Jul 26, 2026

दीड वर्षांचा असताना वडिलांची हत्या; २३ वर्षांनंतर मुलाने घेतला सूड, मुख्य आरोपीचा २८ वार करून खून

प्रतिनिधी पुण्यातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ ११ जुलै रोजी घडलेल्या खून प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. तब्बल २३ वर्षांपूर्वी…

ByBymnewsmarathi Jul 21, 2026

3 मुलांना स्कॉर्पिओवरून बसवून काढली धिंड; चप्पलेनं मारणाऱ्या महिलेलाच पोलिसांनी हटकलं !

प्रतिनिधी पुणे आता बिहारच्या पलीकडे गेलं असं म्हणणे हे चुकीचं ठरणार नाही. मारामारी, खून आणि कोयत्याने हल्ले करण्याच्या…

ByBymnewsmarathi Jul 21, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026