प्रतिनिधी- फिरोज भालदार
सांगलीत एक जण जिवानिशी गेला.. आता फलटण तालुक्यात ही काल रात्री म्हणे डोके फुटाफुटी झाली.. अलीकडच्या काही महिन्यात लावणी मध्ये इतरांची नावे मागे पडून अचानकच गौतमी पाटील हे नाव पुढे आले आहे …या गौतमी पाटील लावणीच्या कार्यक्रमात अश्लील हावभाव केल्यानंतर तिची हवा झाली . अर्थातच चांगल्याची हवा होतच नाही.. काहीतरी वेगळे करावे लागते, त्यात तिचा दोष काय? पण म्हणून काय प्रत्येक कार्यक्रमातच काहीतरी घडावे का?
गौतमी पाटील हिचा कार्यक्रम फलटण तालुक्यातील नदीकाठच्या एका गावात झाला. सांगली जिल्ह्यात झालेल्या संकटामुळे इथे तसे काही घडू नये याची तंबी अगोदरच बहुदा संयोजकांना दिली असावी, त्यामुळे काहीजण अगदी तयारीतच होते. त्यामुळे कोणी नाचायला उठला की त्याला गप्प करण्याची वेगळी तजवीज करण्यात आली होती. जसा कार्यक्रम बहरात आला आणि लोकांना चिव येऊ लागला, तस तसा कार्यक्रम शिस्तीतच झाला पाहिजे यावर भर असलेल्यांनीही कारवाईचा ‘बडगा’ उगारला . यात काही जणांना चांगलाच मुका मार लागला, तर काही जणांना अगदी रक्तबंबाळ होण्याची वेळ आली. रात्रीच्या वेळी काही जण दवाखाने शोधत फिरत होते अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शनी यांनी दिली . अस म्हणतात की हा महाराष्ट्र टाळाने सुधारला नाही आणि चाळाने बिघडला नाही.. पण अलीकडे काळात चाळ एवढा बिघडायला लागलाय की, माणसं युद्धापेक्षा लावणीतच जास्त घायाळ होऊ लागले आहेत.
अध्यक्ष महोदय, यावर काहीतरी निर्णय व्हायला हवा .