• Home
  • क्राईम
  • मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या एकाला तीन वर्षे सक्तमजुरी
Image

मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या एकाला तीन वर्षे सक्तमजुरी

प्रतिनिधी

मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या एकाला वडगाव मावळ न्यायालयातील सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दिलीप बबनराव घोडेकर (वय ५०, रा. मावळ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. घोडेकरविरुद्ध शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी दुकानातून दूध घेऊन येत होती. त्यावेळी घोडेकरने तिला अडवले आणि तिच्याशी अश्लील वर्तन केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील स्मिता चौगुले यांनी बाजू मांडली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालायने घोडेकरला तीन वर्ष सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी १५ हजार रुपये पीडित मुलीस द्यावे, असे न्यायालायने आदेशात म्हटले आहे.

देहूरोडचे विभागाचे तत्कालिन सहायक पोलीस आयुक्त देवीदास घेवारे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एस. गाडीलकर यांनी तपास केला. न्यायालयातील पोलिस हवालदार नितीन पवार यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026