मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 16 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

निंबुत येथील श्री. संभाजी नारायण काकडे यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड 

mnewsmarathi 16 Nov 2026 1 मिनिट वाचन 4,499 वाचन

प्रतिनिधी

 संभाजी काकडे यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदी निवड

निवडीमुळे निंबुतसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, सामाजिक समस्या आणि जनहिताचे विषय सातत्याने मांडणारे संभाजी काकडे यांनी सामाजिक क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच गावाच्या विकासासाठी ते नेहमीच सक्रिय असतात.

महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या सामाजिक कार्याला आता शासकीय स्तरावर आणखी एक नवी दिशा मिळणार आहे. पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांना कायद्याच्या चौकटीत सहकार्य करताना गावातील सामाजिक सलोखा, शांतता, बंधुभाव आणि एकोपा अबाधित ठेवण्यासाठी या पदाच्या माध्यमातून ते योगदान देऊ शकतील.

गावातील तंटे, सामाजिक गैरसमज आणि वादविवाद यांचे सौहार्दपूर्ण वातावरणात निराकरण व्हावे, नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि प्रशासन व जनता यांच्यात समन्वय राहावा, यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

एका सामान्य कुटुंबातून पुढे येत पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदापर्यंत झालेला हा प्रवास निंबुत गावासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांच्या निवडीमुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi