बारामतीचा पश्चिम भाग थंडीने गारठला

इतर

प्रतिनिधी.

बारामती तालुक्यातील प्रामुख्याने निंबुत,सोमेश्वर भागामध्ये थंडीची चांगलीच लाट उसळलेली आहे या वाढलेल्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पाहावयास मिळत आहेत. कमालीचा परा घसरल्याने नागरिक दिवसभर अंगामध्ये उबदार कपडे घालूनच आपली दैनंदिन कामे करत आहेत. मात्र या वाढलेल्या थंडीने वयोवृद्ध नागरिकांची चांगलीच तारांबळ देखील होत आहे. वाढलेल्या या थंडीचा फायदा शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. गहू,हरभरा, मका,ज्वारी,या पिकांकरिता ही वाढलेली थंडी फायदेशीर असल्याचे शेतकरी वर्ग मधून बोलले जात आहे. येणाऱ्या दिवसात निसर्गाने चांगली साथ दिली तर येणाऱ्या पिकामुळे भरघोस उत्पादन मिळेल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.