प्रतिनिधी- फिरोज भालदार
मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा महिला सहसचिव पदी सौ. सपना कामराज शिंदे यांची या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली
सौ .सपना कामराज शिंदे यांचा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने पाहुन श्री. डॉ .भगवान भाई दाटीया यांच्या सूचनेनुसार श्री. जीएम भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ. अपूर्वा शिंदे यांच्या शिफारशीवरून सौ.सपना शिंदे यांची महिला सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून सौ. सपना कामरा शिंदे यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल आपणावर टाकलेला विश्वास मी सार्थक करू असे सपना शिंदे यांनी सांगितले .