महाराष्ट्रातील बहुजन महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणारे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वडगाव निंबाळकर येथे रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला.

इतर

प्रतिनिधी- फिरोज भालदार

पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून संस्था उभ्या केल्या असे विधान केले होते. त्यांच्या वक्तव्याचा वडगाव निंबाळकर ग्रामस्थ व विविध संघटनेच्या वतीने शांतेतत रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष पै.नानासाहेब मदने तालुका युवक अध्यक्ष अमोल गायकवाड,छबुराव साळवे, अँड सचिन साळवे,डॉ प्रशांत साळवे,आर्यन साळवे,दत्तात्रय खोमणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून निषेध व्यक्त केला. यावेळी चंद्रकांत पाटलांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी वडगाव निंबाळकर गावचे मा.तंटामुक्ती अध्यक्ष उन्मेश शिंदे,युवा नेते ऋषिकेश शिंदे, वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य संजय साळवे,अजित भोसले,पिंटू किर्वे,आप्पा दरेकर,अँड.विश्वास कोकरे,सचिन साळवे,नंदकुमार जाधव,सतिश साळवे,डॉ प्रवीण जगताप,वैभव साळवे,अभिजित साळवे,विक्रम साळवे,गणेश रांगोळे,छोटू जाधव,सोनु खोमणे,संग्राम जाधव,सौरभ दरेकर,राहुल गायकवाड,इकबाल आत्तार,मयुर अहिवळे,अभिजित साळवे,तसेच युवक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या वतीने पोलिस नाईक कुंडलिक कडवळे,पोलिस अमलदार संतोष जावेर,पोलीस अमलदार नितिन साळवे यांनी चोख बंदोबस्त ठेवून लेखी निवेदन स्वीकारले…