वडगाव निंबाळकर येथे बामसेफ राष्ट्रीय संघटनेचा मेळावा संपन्न

इतर

बामसेफ हे दुसरे तिसरे काही नसून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधक आंदोलन आहे.बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार काळे यांनी वडगाव निंबाळकर येथील एका कार्यक्रमात बोलताना वरील विधान केले आहे.

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे बामसेफ या राष्ट्रीय संघटनेचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमांसाठी बामसेफ या संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदकुमार गायकवाड बामसेफचे पुणे जिल्ह्याचे प्रचारक डॉ दत्तात्रय जगताप तसेच दौंड तालुक्याचे अध्यक्ष मनोहर कोकरे आर एम बी के एस चे पुणे जिल्हाध्यक्ष अश्विन कुमार कांबळे उपस्थित होते

पुढे बोलताना कुमार काळे म्हणाले 24 सप्टेंबर 2022 ला सत्यशोधक समाज स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने संपूर्ण भारतभर ओबीसी जात निहाय जनगणनेचे दहा हजार कार्यक्रम संपूर्ण भारतभर घेण्यात येणार आहे. 35 राज्यांपैकी २२राज्य मध्ये राज्य अधिवेशन झाले आहे 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2022ला ठाणे जिल्ह्यातील कल्याण या शहरांमध्ये बामसेफ या राष्ट्रीय संघटनेचे 39 वे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन बामसेफ या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार काळे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव निंबाळकर बामसेफ या युनिटने केले होते. यावेळी डॉ प्रवीण जगताप,डॉ.प्रशांत साळवे दत्तात्रय गिरमे, खाटमोडे भाऊसाहेब, नितीन गायकवाड, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रशांत साळवे यांनी केले तर आभार दत्तात्रय गिरमे यांनी मानले.