• Home
  • माझा जिल्हा
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे बालसंस्कार शिबिराचे आयोजन .
Image

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे बालसंस्कार शिबिराचे आयोजन .

प्रतिनिधी –

  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे दिनांक 15 एप्रिल 2025 ते 30एप्रिल 2025 या कालावधीमध्ये शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . विद्यार्थ्यांना बालवयात बालमनावर रुजवायच्या छोट्या छोट्या गोष्टी, सकाळी उठण्याच्या सवयी , गुरुजनांचा आई-बाबांचा आदर . ओंकार ध्यान – धारणा गप्पागोष्टी योग अभ्यासाचे धडे अनुलोम मिलन यासारखे चित्त एकाग्रता साठी पूरक उपक्रम राबवण्या वर भर दिला आहे. पद्मासन, शिर्षासन ,मुक्त हालचाली यासारखे विविध उपक्रम शाळेत राबवले जात आहेत .याबरोबरच मैदानी खेळात कॅरम, बुद्धिबळ ,क्रिकेट, लंगडी , मल्लखांब रस्सीखेच, गोट्या खेळणे, विटी दांडू ,लगोर, टायर फिरवणे अशा जुन्या पारंपारिक खेळांचाही विद्यार्थ्यांना लाभ दिला जात आहे . शाळेमध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे सौ मनीषा चव्हाण यांच्या मदतीने शाळेमध्ये सदरचे उपक्रम मोठ्या उत्साहामध्ये राबवण्यावर भर दिला जात आहे . विद्यार्थी अभ्यासाबरोबर विविध खेळांमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थी विकास होण्यास मदत होते . पहिल्या आठवड्यात पालक श्री राहूल चव्हाण , ऋषिकेश शितोळे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी योगा ध्यान -धारणा ,ओंकार भजन आदी उपक्रमांना विद्यार्थी वर्गाने छान प्रतिसाद दिला . उर्वरित दिवसात इ ४ थी निरोप समारंभ, स्नेहभोजन , परिसर भेट आदी उपक्रम 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करणे वर भर दिला जाईल असे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी सांगितले .

    शाळेच्या विविध उपक्रमांचा फायदा होत असून शाळेमध्ये पालकांच्या आग्रहास्तव मंथन, आय टी एस ,ओलंपियाड, डायमंड , एम टी एस ,श्रेयशी अशा विविध स्पर्धा परीक्षा माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडे लक्ष दिल्याने शाळेचा पट वाढत असून शाळेतील उपक्रमांचा फायदा पालक घेत आहेत . २०२५ मध्ये झालेल्या विविध स्पर्धा परीक्षा मध्ये शाळेतील विद्यार्थी राज्य जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत . अबॅकस सारख्या उपक्रमांना सुद्धा पालकांचा प्रतिसाद छान दिसून येतो . शाळेतील शिक्षकांची एकजूट झोकून काम करण्याची सकारात्मक मानसिकता मुळे जून 2025 मध्ये करावयाच्या पट नोंदणीचे काम १००% पूर्ण झाले असून शाळेमध्ये वर्गातील प्रवेश पूर्ण क्षमतेने झाले आहेत . इ १ ली शाळापूर्व तयारी नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होते . इ १ ली ३० प्रवेश झालेमुळे प्रवेश देणे बंद केले आहे . शाळेच्या विविध उपक्रमांचा फायदा होत असल्याने इंग्रजी खाजगी माध्यमातून नेहमीप्रमाणे शाळेत प्रवेश झाले आहेत . पुढील शैक्षणिक वर्षाचे संपूर्ण नियोजन पालक शिक्षक सहविचार सभेमधून पूर्ण झाले आहे .

     शाळेच्या विविध उपक्रमाबद्दल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री निलेश गवळी साहेब विस्तार अधिकारी श्री संजय जाधव साहेब केंद्रप्रमुख श्री संतोष खलाटे यांनी कौतुक केले .

Releated Posts

उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतानाच लग्नसराईचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे…

प्रतिनिधी (लेखन- सोपान कुचेकर) गावोगावी मंगल कार्यालये, बँड-बाजा, वाजंत्री आणि पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे… पहाटेपासून सुरू होणारी…

ByBymnewsmarathi May 13, 2026

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’

प्रतिनिधी             मानवतेच्या कल्याणासाठी एखाद्या महान आत्म्याचे संपूर्ण जीवन समर्पित झाले की, त्या…

ByBymnewsmarathi May 12, 2026

नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा बारामती मध्ये तीव्र निषेध

प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या या हृदयद्रावक…

ByBymnewsmarathi May 4, 2026

बारामतीत बाहेरच्या आमदारांची प्रचारासाठी खरंच गरज आहे का?”

प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक…

ByBymnewsmarathi Apr 19, 2026