मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 29 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 29 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार? सभासदांसह बारामतीचे लक्ष निर्णयाकडे .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 29, 2026 1 मिनिट वाचन 3,501 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांमध्ये उत्सुकता वाढली असून ही निवडणूक प्रत्यक्षात होणार की सर्वानुमते बिनविरोध पार पडणार याकडे आता संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया जशी जवळ येत आहे तशी इच्छुकांकडून उमेदवारीसाठी हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

त्यामुळे निवडणूक रिंगणात कोण कोण उतरणार आणि कोणत्या गटाकडून कोणाला संधी मिळणार आणि विविध गटांमध्ये कोणत्या प्रकारची भूमिका घेतली जाणार याबाबत सभासदांमध्ये चर्चा रंगली आहे. या दरम्यान कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होणार का ? याकडेही सभासदांचे लक्ष लागले आहे. मात्र विविध इच्छुकांची संख्या गटांची भूमिका आणि उमेदवारीबाबतचे निर्णय यावर निवडणुकीचे अंतिम चित्र अवलंबून राहणार आहे.

‘निवडणूक की बिनविरोध?’ हा प्रश्न सध्या सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी काही दिवसांत उमेदवारी आणि पॅनेलच्या हालचालींना वेग आल्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची सत्ता कोणाच्या हातात जाणार यापेक्षा सध्या निवडणूक प्रत्यक्षात रंगणार की सर्वानुमते कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार याकडे सभासदांसह बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख