बारामती ! वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विदया मंदिर प्रशालेमध्ये गणित दिवस उत्साहात साजरा .

इतर

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विदया मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेत श्रीनिवास रामानुजन जयंती व राष्ट्रीय गणित दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशालेत गणित संकल्पना वर आधारीत अत्यंत चांगली 70 ते 75 उपकरणे / प्रतिकृती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात ठेवली होती . गणित संबोध स्पष्ट करणाऱ्या रांगोळी चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते . सदर प्रदर्शनाचे उदघाटन वडगांव निं. ग्रा.प . उपसरपंच सौ .संगिता भाभी शहा यांच्या हस्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन गार्डी , उपाध्यक्ष गणेश दरेकर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विकास साळूंके , मारुती कारंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले . सदर प्रदर्शनाचे आयोजन गणित विज्ञान विभाग गायकवाड सर, माने सर, सौ देशमुखे मॅडम, स्नेहल बनकर मॅडम, कला विभाग लालबोंद्रे सर , मोहिते मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट रित्या केले . सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कार्यक्रमास चांगले सहकार्य देखील लाभले . विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्त सहभाग घेतला होता . कार्यक्रमाचे प्रास्ताविक गायकवाड सरांनी केले ,अध्यक्षीय मनोगत मध्ये प्राचार्य बनकर सरांनी गणित तज्ञ रामानुजन यांची माहिती सांगितली, आभार माने सरांनी मानले .