प्रतिनिधी – सोपान कुचेकर
पिंपरे बुद्रुक- 26/ 12/ 2022 रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक धायगुडे मळा येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. गुरुवार दिनांक 22 /12/ 2022 रोजी दुपारी 03 वा. शाखेच्या प्रांगणात शैक्षणिक वर्षातील हा दिवस थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाखेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण एन. एम. सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाखेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.तांबे व्ही.डी. मॅडम आणि श्री. जाधव एन. एम. सर यांनी भूषवले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. खाडे आर. एन.सर यांनी केले. श्री. जाधव सर यांनी श्रीनिवास रामानुजन यांनी गणित विषयांच्या संशोधनातून खूप मोठी भर टाकलेली आहे असे त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले. राष्ट्रीय गणित दिनानिमित्त शाखेमध्ये इ. 5वी ते 10वी मधील निवडक विद्यार्थ्यांचे गट करून प्रश्नमंजुषा घेण्यात आली होती. प्रश्नमंजुषाचे सर्व आयोजन श्री मुगळे एन.टी. सर यांनी पूर्ण केले. स्पर्धेतील विजयी संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले या स्पर्धेसाठी गावातील ग्रामस्थ श्री .नरेंद्र निगडे यांच्यातर्फे बक्षीस देण्यात आले. गणित शिक्षक श्री. दळवी आर.डी. सर यांनी गणितीय कोडे व गणितीय खेळ घेऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले .शेवटी श्री. खाडे सरांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कार्यक्रमाचे आभार मानले व अशा प्रकारे कार्यक्रम आनंददायी उत्साहात संपन्न झाला.















