• Home
  • क्राईम
  • माळेगाव पोलीस स्टेशन ची दमदार कामगीरी करीत एका आरोपीसह २ गावठी पिस्टल सह १ जिवंत काडतुसे जप्त.
Image

माळेगाव पोलीस स्टेशन ची दमदार कामगीरी करीत एका आरोपीसह २ गावठी पिस्टल सह १ जिवंत काडतुसे जप्त.

प्रतिनिधी

मागील काही दिवसापासून पुणे जिल्हयामध्ये अनेक ठिकाणी गुन्हयाचे प्रमाण वाढलेहोते. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक अंकित गोयल सो यांनी पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये अग्निशस्त्र जप्ती करणेकामी कोम्बींग ऑपरेशन तसेच अभिलेखावरील संशयित आरोपीची वाहन झडती तसेच घरझडतीचे अभियान चालु होते. त्याचे सुचनाचे पालन करत मा पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी आपल्या पथकाला सोबत घेवुन गावठी पिस्टल ची शोध मोहीम हाती घेतली . हददीमधील संशयित आरोपीचे वाहन घर झडती घेण्याचे काम चालु होते.

माळेगाव पोलीस स्टेशनचे हदिदतील लकडेनगर येथील एका इसमाचा सोशल मिडीया वरील व्हिडीओ पथकातील पोलीस अमलदार राहुल पांढरे व विजय वाघमोडे यांना प्राप्त झाला त्यानुसार पथकातील पोसई साळवे, पोलीस अमलदार राहुल पांढरे, विजय वाघमाडे ज्ञानेश्वर मोरे यानी बातमीदारामार्फत बातमी मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा बातमीदरामर्फत ता. २५ / १२ / २०२२ रोजी दुपारी २२/३० वाचे सुमारास किरण अवचर हे पोलीस स्टेशन ला हजर असताना त्याना गोपनीय बातमीदाराचा फोन आला की मौज माळेगाव पिरबाब दर्गा मैदान येथे एक इसम गावठी पिस्टल विक्री करणेकरीता येणार असलेबाबत खात्रीशिर बातमी मिळाली तेव्हा पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी पथकाला बोलावुन सदर बातमी चा आशय सांगुन सदर इसमावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्यानंतर पथक रवाना होवुन माळेगाव पिरबाब दर्गा मैदान येथे सापळा रचुन बसले असता त्यावेळी २१ / ४५ वाचे दरम्यान एक इसम संशयीत हालचाली करताना दिसला तेव्हा त्यास पथकातील स्टाफ ने इसमास ताब्यात घेतले त्यास त्याचा नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव आकाश सुरेश हजारे वय २४ वर्षे रा शिंदेवाडी ता. माळशिरस जि.सोलापुर सध्या रा. लकडेनगर माळेगाव ता बारामती जि.पुणे असे सांगितले असुन सदर सोशल मिडीया वरील व्हिडीओ हा सदर इसमाचा असलेबाबत खात्री झाली.

त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला आहे १) ५०,०००/- रुपये किमतीचे २ गावठी पिस्टल अनुक्रमे काळे व सिल्वर रंगाचे बाजुस लाल रंगाची पट्टी असलेले लोंखडी धातुचे मॅगझीन सह कि अं. २) ३०० /- रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस त्याचे पाठिमागील बाजुस पितळी ७.६५ के एफ मार्क कि अ.५०,३०० रुपये किंमतीचे २ गावठी पिस्टल १ जिंवत काडतुस जप्त करुन आरोपी याचे वर भारतीय शस्त्र अधिनियम ३(२५), ५ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम क. १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गन्हयाचा अधिक तपास पोसई देविदास साळवे हे करीत आहेत

सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक अंकित गोयल सो, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशनचे विषेश पथकातील पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे सहा. फौजदार जयवंत ताकवणे, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, नंदकुमार गव्हाणे, जयसिंग कचरे यांनी केली आहे.

Releated Posts

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026