प्रतिनिधी
सोमेश्वर नगर (०४/०१/२०२३) -येथील मु. सा. काकडे महाविद्यालया मध्ये इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम वर्गातील विद्यार्थ्यांचा पालक मेळावा हा बारावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर होते यावेळी संस्थेचे सहसचिव सतीश लकडे व्यवस्थापन समिती सदस्या सौ. सुजाता भोईटे, उपप्राचार्य जगताप आर एस पर्यवेक्षिका सणस मॅडम बहुसंख्येने पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगता मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर यांनी पालक मेळावा म्हणजे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक पातळीवर जाऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद म्हणजे पालक मेळावा. तसेच महाविद्यालयात विद्यार्थिनींची सुरक्षितता व महाविद्यालयातील शिस्त तसेच महाविद्यालयात असणाऱ्या शैक्षणिक सुविधा त्यामध्ये सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त वाचनकक्ष, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व पोलीस मार्गदर्शन केंद्र याविषयी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जगताप आर. एस. सरांनी बारावीच्या बोर्ड परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालक- शिक्षक संघाचे समन्वयक प्रा. दत्तराज जगताप व आभार प्रा. सणस मॅडम यांनी मानले.