पत्रकार सन्मान सोहळा इंदापूर येथे संपन्न झाला.

इतर

इंदापूर प्रतिनिधी गजानन टिंगरे

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,देशातील पहीली क्रांतीकारी विद्यार्थीनी मुक्ता साळवे, आचार्य बाळशास्री जांभेकर, देशातील पहीली मुस्लिम शिक्षिका फातीमा शेख,राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांचे संयुक्त जयंतीचे औचीत्य साधुन राज्य मराठी पत्रकार संघ, दैनिक उजनी टाईम्स व फुले प्रहार शुभारंभ व पत्रकार सन्मान सोहळा आणि स्नेहभोजन समारंभ इंदापूर येथील राधीका रेसिडेन्सी हाॅलमध्ये बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी सन्माननिय गणेश इंगळे, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील,माजी,जय इन्स्टिट्युटचे सर्वेसर्वा जयंत नायकुडे(सर),माजी उपनगराध्यक्ष अरविंद (तात्या)वाघ,माजी उपनगराध्यक्ष कृष्णाजी ताटे, सुवर्णयुग सह.पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन पोपट नाना पवार,समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष युवराज आण्णा मस्के, नगरपरिषद गटनेता कैलास कदम,भिमशक्ती तालुकाध्यक्ष युवराज मामा पोळ, आरपीआय इंदापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे,अॅड.समीर टीळेकर,अॅड.नितीन राजगुरू,मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र भाऊ शिंदे,लहुजी शक्ति सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप,संजय उर्फ डोनाल्ड शिंदे,भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष तानाजी धोत्रे, राष्ट्र सेवादलाचे रमेश शिंदे,गफुरभाई सय्यद, राजेंद्र भाडळे,शुभम भैय्या पवार,गौरव राऊत, दत्तात्रय ठोंबरे सर, प्रशांत सिताप,रविंद्र म्हेत्रे,हमीद आतारनितिन खिलारे,विकास खीलारे,महादेव लोखंडे,लक्ष्मण गुणवरे,योगगूरू अनपट सर,सधीरशेठ मखरे,सचिन बोराटे सर,गणेश जाधव,संजय राऊत,श्रीकांत मखरे,महेश ढगे,कुमार भांगे यांचेसह परिसरातील प्रतिष्ठीत मान्यवर व मोठ्या प्रमाणामध्ये जिजाऊ सावित्रीच्या लेकी उपस्थित होत्या.प्रस्ताविक प्रकाश आरडे यांनी केले,तर सुत्रसंचलन संतोष नरूटे सर यांनी केले तर आभार सुधाकर बोराटे यांनी मानले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ व जयंत नायकुडे सर यांना विशेष पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.तर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या सावित्री जिजाऊच्या १५ लेकींना सावित्रीबाई फुले पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात रूग्णांची सेवा करणार्‍या १८ जणांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आयोजक सुधाकर बोराटे,प्रकाश आरडे,समीर सय्यद,शिवाजी पवार,दत्तात्रय मिसाळ,करण बोराटे,संतोष फुले इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.