• Home
  • ताज्या बातम्या
  • सोमेश्वरच्या चेअरमन यांनी सभासदांची लुट थांबवावी. श्री.सतीश काकडे.

सोमेश्वरच्या चेअरमन यांनी सभासदांची लुट थांबवावी. श्री.सतीश काकडे.

सोमेश्वरच्या चेअरमन यांनी सभासदांची लुट थांबवावी. श्री.सतीश काकडे.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अनुदानाच्या खैरातीची जहिरात करून सभासदांची दिशाभुल केलेली आहे. कारखान्याने कोट्‌यावधी रूपये खर्चुन विस्तारवाढ केलेली आहे. कारखान्याचे आज प्रति दिन १० हजार मे. टन गाळप क्षमतेने गाळप सुरू आहे १० मार्च २०२६ पर्यंत कारखान्याने १२ लाख १२ हजार मे.टन उसाचे गाळप केलेले आहे. कारखान्याने फेब्रुवारी २०२६ मध्ये गाळपास येणाऱ्या उसास १००/- रू. प्रति मे.टन, मार्च २०२६ महिन्यामध्ये गाळपास येणाऱ्या उसास २००/- रू. प्रति मे.टन व एप्रिल २०२६ महिन्यामध्ये गाळपास येणाऱ्या उसास ३००/- रू. प्रति मे.टन अनुदान जाहिर केलेले होते. परंतु मार्च २०२६ व्या तिसऱ्या आठवड्यात कारखाना बंद होणार आहे अशी बातमी वर्तमान पत्रामधुन कारखान्याने दिलेली असल्याने कारखान्याचा गाळप हंगाम जर मार्चच्या शेवटच्या आठवड्‌यातच बंद होणार आहे. तर मग एप्रिल मधील अनुदान कोणाला देणार? त्याचा कोणत्या सभासदांना लाभ होणार? का संचालक मंडळ वाटुन घेणार आहात? तरी कारखान्याने अनुदानाची जी घोषणा केलेली आहे ती पुर्णपणे फसवी व दिशाभुल करणारी आहे.

सोमेश्वरच्या सभासदांचा फेब्रुवारी २०२६ मध्ये २ लाख ६३ हजार मे. टन उस गाळपास आला. १००/-

रू. प्रति मे. टनाप्रमाणे २ कोटी ६३ लाख रू. सभासदानी अतिरिक्त जादा रक्कम मिळाली परंतु सभासदांचे उसतोडीसाठी प्रति एकर ४ ते ८ हजार रूपये तोडणी वाहतुकदारांनी घेतलेले आहेत. सरासरी एकरी ४० टन उत्पन्ना प्रमाणे ५५०० सभासदांचे जवळपास २ कोटी ७५ लाख रूपये नुकसान झाले आहे. मग या अनुदानाचा फायदा झाला की तोटा झाला याचे आत्मपरिक्षण चेअरमन व संचालक मंडळाने करावे. तसेच मार्च महिन्यामध्ये आजपर्यंत ६५ हजार मे. टन उस आला. २००/- रू. प्रति मे. टनाप्रमाणे १ कोटी ३० लाख रू. सभासदांना अतिरिक्त मिळाले परंतु सभासदांचे उसतोडीसाठी प्रति एकर ५ ते १० हजार रूपये तोडणी वाहतुकदार घेत आहेत. त्यामुळे सरासरी एकरी ३० टन उत्पन्ना प्रमाणे १५०० सभासदांचे सरासरी १ कोटी २० लाख रूपये नुकसान झालेले आहे. त्या रक्कमेमध्ये दिवसे दिवस वाढच होणार आहे. उशिरा उस तुटल्यामुळे सभासदांचे १० ते १५ मे.टन वजन घटलेले आहे त्याचे काय? दुबार पिकाला सभासद मुकलेला आहे. असे असताना गेटकेन धारकांचा ९५ हजार मे. टन उस संचालक मंडळाने गाळपासाठी आणुण सभासदांच्या जखमेवर मिठच चोळलेले आहे. राज्यात गाळप, रिकवारी, आल्कोहल विकीचा डंका करून सभासदांना मात्र उस उत्पादनात चेअरमन यांनी जिवे मारले आहे. त्यामुळे वर्तमान पत्रामधुन केवळ प्रसिध्दी मिळवुन निवडणुक डोळयासमोर ठेवुन अनुदान जाहिर करून सभासदांबी दिशाभुल चालविलेली आहे. कारखान्याने सभासदांच्या जिवावर कोट्यावधी रूपये कर्ज काबुन विस्तारवाढ केलेली आहे. त्याचा फायदा सभासदांना केव्हा होणार? मागील दोन ते तीन वर्षांपुर्वी विस्तार बाढ करायच्या वेळी कारखाना कार्यक्षेत्रात फार मोठा उस उपलब्ध होणार असल्याचे भासवत कारखान्याची विस्तावाढ केली त्यास सर्व सभासदांनी एकमुखी मंजुरी दिली. मग गेली २ वर्ष कारखाना गेटकेन ऊस गाळपासाठी आणुन सभासदांचे नुकसान का करीत

आहे. सभासदांचा उस वेळेत गाळला असता तर सभादांना दुबार पिक घेता आले असते व उसाचा उताराही जादा मिळाला असता तरी सभासदांच्या या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?

तरी चेअरमन यांनी तात्काळ फेब्रुवारी व मार्च मध्ये गाळपास आलेल्या उसाचे तोडणी वाहतुकदारांनी घेतलेली रक्कम त्यांच्या कडुन वसुल करून शेतकऱ्यांना देण्यात यावी. तसेच फेब्रुवारी २०२६ पासुन गाळपास आलेल्या उसास २००/- रू प्र.मे.टन अनुदान जाहीर करावे व मार्च महिन्यामध्ये गाळपास येणाऱ्या उसास ३००/- रू. प्रति मे.टन अनुदान तात्काळ जाहिर करावे.

सोमेश्वर कारखान्याने दोन दोन शेतकी अधिकारी कामावर ठेवलेले असताना तोडणी वाहतुकदार सभासदांची पिळवणुक करून उस तोडीसाठी एकरी ८ ते १० हजार रूपये घेत आहेत. मग हे शेतकी अधिकारी नक्की काय काम करतात? यांच्यावर चेअरमन व संचालक मंडळाचे कोणतेही नियंत्रण नाही का?

Releated Posts

सोमेश्वरच्या चेअरमन यांनी सभासदांची लुट थांबवावी. श्री.सतीश काकडे.

प्रतिनिधी. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अनुदानाच्या खैरातीची जहिरात करून सभासदांची दिशाभुल केलेली आहे. कारखान्याने कोट्‌यावधी रूपये खर्चुन…

ByBymnewsmarathi Mar 11, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयाला ‘नॅशनल बेस्ट कॉलेज अवॉर्ड’ जाहीर

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्लोबल फाउंडेशन, इंडिया या…

ByBymnewsmarathi Mar 10, 2026

आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा

प्रतिनिधी. सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक…

ByBymnewsmarathi Mar 10, 2026

मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये जिल्हास्तरीय रोजगार महामेळावा संपन्न.

प्रतिनिधी. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व कौशल्य विकास आणि उद्योजकता केंद्र या आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर…

ByBymnewsmarathi Feb 28, 2026