• Home
  • ताज्या बातम्या
  • गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

प्रतिनिधी.

 पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असून कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही.

जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागामार्फत सर्व गॅस एजन्सींवर सतत देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय फिरती व दक्षता पथके गठित करण्यात आली आहेत. कोणत्याही वितरकाकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री करणे किंवा इतर अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.तसेच हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवांना तसेच विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांना गॅस सिलेंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Releated Posts

निरंकारी सतगुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त मानवसेवेचा प्रेरणादायी उपक्रम आरोग्य तपासणी शिबिरांद्वारे समाजसेवेची अनमोल भेट

प्रतिनिधी.  परमपूज्य सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेतून तथा मार्गदर्शनात कार्यरत असलेले संत निरंकारी मिशन हे मानवसेवा,…

ByBymnewsmarathi Mar 12, 2026

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये एका रात्रीमध्ये सात जाग्यावर घरफोडी ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण .

प्रतिनिधी – फिरोज भालदार दिनांक १० मार्च २०२६ रोजी वडगाव निंबाळकर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस सात जागेवर घोरफोडी…

ByBymnewsmarathi Mar 11, 2026

सोमेश्वरच्या चेअरमन यांनी सभासदांची लुट थांबवावी. श्री.सतीश काकडे.

सोमेश्वरच्या चेअरमन यांनी सभासदांची लुट थांबवावी. श्री.सतीश काकडे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अनुदानाच्या खैरातीची जहिरात करून सभासदांची…

ByBymnewsmarathi Mar 11, 2026

सोमेश्वरच्या चेअरमन यांनी सभासदांची लुट थांबवावी. श्री.सतीश काकडे.

प्रतिनिधी. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अनुदानाच्या खैरातीची जहिरात करून सभासदांची दिशाभुल केलेली आहे. कारखान्याने कोट्‌यावधी रूपये खर्चुन…

ByBymnewsmarathi Mar 11, 2026