• Home
  • क्राईम
  • बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांकडून अवैद्य दारू विक्रेत्यांची धरपकड. हे उशिरा सुचलेले शहाणपण? यामुळे नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चा.
Image

बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांकडून अवैद्य दारू विक्रेत्यांची धरपकड. हे उशिरा सुचलेले शहाणपण? यामुळे नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चा.

संपादक – मधुकर बनसोडे.

काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामधील हडपसर येथे भेसळयुक्त दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या माध्यमांमधून पाहायला मिळताच बारामती तालुक्यातील पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले आणि अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांवरती काही ठिकाणी गुन्हे दाखल केले तर काही ठिकाणी अवैद्य दारूचे अड्डे उध्वस्त केले.

बारामती तालुक्यात अवैद्य दारूविक्रीविरोधात पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या कारवायांमुळे अवैद्य दारू विक्रेत्यांचे ढाबे दणाणले  असून “हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे का?” असा थेट सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. पुण्यातील हडपसर येथे भेसळयुक्त दारूमुळे निष्पाप नागरिकांचे मृत्यू झाल्यानंतरच प्रशासनाला जाग आली का, असा रोष व्यक्त केला जात आहे.

बारामती तालुक्यात अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे अवैद्य दारू, गुटखा, मटका आणि ऑनलाइन चक्रीसारखे धंदे उघडपणे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये नेहमीच होत आली आहे. अनेक वेळा नागरिकांनी 112 वर फोन करून तक्रारी दिल्या, मात्र तक्रार करणाऱ्यांची नावे थेट संबंधित अवैद्य धंदेवाल्यांपर्यंत कशी पोहोचतात? पोलिस यंत्रणेमधूनच गोपनीयतेचा भंग होतो का? असे गंभीर प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत.

नागरिकांचा आरोप आहे की, एखादी मोठी दुर्घटना घडली किंवा मृत्यू झाला की प्रशासन हलते. अन्यवेळी मात्र सर्व काही “आलबेल” असल्यासारखे वातावरण निर्माण केले जाते. आज काही अड्ड्यांवर धाडी टाकल्या जात असल्या तरी या कारवाया कायमस्वरूपी चालणार की फक्त दिखाऊ मोहिम ठरणार, याबाबत नागरिकांमध्ये मोठी शंका आहे.

“बारामतीत कायदा फक्त कागदावरच आहे का?” असा संतप्त सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. अवैद्य धंद्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी कठोर आणि प्रामाणिक प्रशासनाची गरज असल्याची भावना व्यक्त होत असून, गृह विभागात एखादा तुकाराम मुंढे यांच्या सारखा धडाडीचा अधिकारी निर्माण होणार का, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

Releated Posts

एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ४ ची अटक

प्रतिनिधी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने एका मोठ्या कारवाईत एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील पाहिजे…

ByBymnewsmarathi Jun 9, 2026

रांजणगाव MIDC मध्ये देहव्यापारावर धाड; सात महिलांची सुटका, दोन अटकेत

प्रतिनिधी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत एका लॉजिंगमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

जुन्नर तालुक्यात दुहेरी हत्याकांड, रात्रीत होत्याच नव्हत झालं..

प्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ गावच्या हद्दीत बगाडवाडी येथे तळेरान गावच्या शिवेवर राहत असलेल्या मुकने कुटुंबात अत्यंत…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

हुंड्याच्या छळातून १८ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

प्रतिनिधी पुण्यातील कोथरूड परिसरात हुंड्यासाठी छळ करून १८ वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला…

ByBymnewsmarathi May 12, 2026