• Home
  • क्राईम
  • जुन्नर तालुक्यात दुहेरी हत्याकांड, रात्रीत होत्याच नव्हत झालं..
Image

जुन्नर तालुक्यात दुहेरी हत्याकांड, रात्रीत होत्याच नव्हत झालं..

प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ गावच्या हद्दीत बगाडवाडी येथे तळेरान गावच्या शिवेवर राहत असलेल्या मुकने कुटुंबात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून मुलाने झोपेत असलेल्या वडीलाची व सख्या भावाची दगडाने ठेचून हत्या केली असल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली असून ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी या घटनेला दुजोरा दिली आहे.

जयराम महादू मुकने वय.६०, राजेंद्र जयराम मुकने वय.२७ असे हत्या झालेल्या वडील व भावाची नावे असून त्यांची हत्या बाबजी जयराम मुकने वय.३३ याने केली असल्याचा प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की बाबजी मुकने व त्यांचे वडील जयराम मुकने व राजेंद्र मुकने हे एकत्र एका झोपडी वजा घरात राहत होते. मंगळवारी सर्व एकत्र झोपले होते.त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून बाबजी यांने दगडाने मारून त्यांची हत्या केली.

तसेच त्यांच्या बाजूलाच झोपून राहिला.सकाळी परीसरातील नागरीकांनी त्यांना मृत पाहिले असता पोलिसांना या घटनेची माहिती दिली.त्यांनतर ओतूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे.तसेच स्थानिकांच्या माहिती वरून बाबजी मुकने यांस ताब्यात घेतले आहे. याबाबत तक्रार नोंदविण्याचे काम ओतूर पोलिस करत आहेत.तसेच पुढील तपास ओतूर पोलिस करत आहेत.

Releated Posts

एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ४ ची अटक

प्रतिनिधी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने एका मोठ्या कारवाईत एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील पाहिजे…

ByBymnewsmarathi Jun 9, 2026

रांजणगाव MIDC मध्ये देहव्यापारावर धाड; सात महिलांची सुटका, दोन अटकेत

प्रतिनिधी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत एका लॉजिंगमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांकडून अवैद्य दारू विक्रेत्यांची धरपकड. हे उशिरा सुचलेले शहाणपण? यामुळे नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चा.

संपादक – मधुकर बनसोडे. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामधील हडपसर येथे भेसळयुक्त दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या…

ByBymnewsmarathi Jun 2, 2026

हुंड्याच्या छळातून १८ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

प्रतिनिधी पुण्यातील कोथरूड परिसरात हुंड्यासाठी छळ करून १८ वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला…

ByBymnewsmarathi May 12, 2026