मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

लग्नासाठी विरोध करत असलेल्या कारणावरून निंबूत येथे झाली हत्या

mnewsmarathi 26 Nov 2022 1 मिनिट वाचन 9,102 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

लग्नासाठी विरोध करत असलेल्या कारणावरून खुन केल्याचा धक्कादायक घटना निंबूत पठारवस्ती येथे घडली . कठीण बबलू काळे वय 68 वर्षे रा. निंबूत पठारवस्ती ता. बारामती जि. पुणे यांनी आरोपी कांबल्या उर्फ कमलाकर नथ्या भोसले रा. गरदडवाडी ता. बारामती जि. पुणे व याचा जावई आरोपी सोल्जर जेल्या पवार रा. काळज ता.फलटण जि. सातारा यांच्या विरोधात फिर्यादी यांचा मुलगा मयत केंज्या कठीण काळे व 40 वर्षे राहणार निंबूत पठारवस्ती यांचा खून केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. फिर्यादींचा मुलगा त्यांच्या केंज्या कठीण काळे यास आरोपी सोल्जर जेल्या पवार यानी फिर्यादीचा नातू शंभू सतीश काळे याची बायको निशा शंभू काळे तिच्याबरोबर लग्न करायचे आहे असे म्हणत असल्याने फिर्यादीचा मुलगा केंज्या कठीण काळे व नातू शंभू सतीश काळे यांनी लग्नाला विरोध केला होता या कारणावरून आरोपी कांबल्या उर्फ कमलाकर भोसले व सोल्जर पवार यांनी फिर्यादीचा मुलगा केंज्या कठीण काळे यास त्याचा खून करण्याच्या उद्देशाने त्यास दगडाने व घातक हत्याराने त्याच्या डोक्यात गंभीर जखमा करून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत राहुल शामराव काकडे यांच्या शेताच्या रोड लगत असलेल्या कमी पाण्याच्या चारीत टाकून दिले. आरोपींविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. सोमनाथ लांडे हे करीत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi