• Home
  • क्राईम
  • नवीन घर घेण्याच्या प्रयत्नात केलेली कोंढव्यातील धाडसी घरफोडी उघड, लाखोंचा माल जप्त
Image

नवीन घर घेण्याच्या प्रयत्नात केलेली कोंढव्यातील धाडसी घरफोडी उघड, लाखोंचा माल जप्त

प्रतिनिधी

कोंढवा पोलीस ठाणे गुरनं . १२७२/ २०२२, भादविक ४५७,३८० अन्वये दाखल झालेल्या गुन्हयाचे घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिका-यांनी भेट देऊन तपास जलद गतीने करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.. तसेच नमुद गुन्हयाचा समांतर तपास मा.पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांचे आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट ५ करीत होती…

सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोंढवा परिसरातील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले. तसेच घटनास्थळाचे दिशेने येणा-या-जाणा-या सर्व व्यक्ती व त्यांची वाहने तपासण्यात आली. सदर वाहनाचा तपास करीत असताना एक संशईत ज्युपीटर गाडीवर एक इसम जात असताना आढळुन आला. गुन्हे शाखेच्या युनिट-५ कडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गाडी ज्या दिशेनी आली आणि परत गेली तो संपुर्ण रुट काढला असता, ज्युपीटर गाडीवर असलेल्या विशिष्ट स्टीकरवरुन माहिती प्राप्त केली असता ती गाडी रेकॉर्डवरील आरोपी नामे मल्लप्पा साहेबान्ना होसमानी, वय-३१, रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज, पुणे हा वापरत असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलीसांनी आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुमी पडताळुन पाहली असता त्याचेवर यापुर्वी वाहन चोरीचे गुन्हे अनुक्रमे लोणीकाळभोर, चंदननगर आणि हिंजवडी पोलीस ठाणे येथे नोंद असल्याचे आढळुन आले. यानंतर गुन्हे शाखा युनिट-५ पथकाचा सदर इसमावर संशय अधिक बळावला. सदर इरामारा ताब्यात घेणेकामी कात्रज भागामध्ये पोलीस निरीक्षक उल्हास कदम व पथक यांनी सापळा लावुन मल्लप्पा साहेबान्ना होसमानी यास ताब्यात घेतले. युनिट कार्यालयात आणुन त्याचेकडे सखोल व कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने कोंढव्याती सदरची घरफोडी केल्याचे कबुल केले. आरोपीकडे अधिक राखोल तपास केला असता त्याने सदरची चोरी करून आलेल्या पैशात घर घेऊन दुसरीकडे राहण्याचा त्याचा प्लॅन असल्याचे त्याने तपासामध्ये सांगितले. गुन्हयाचे

तपासात अटक आरोपी याचेकडुन पोलीसांनी सोन्याचे व हि-याचे दागिने असा एकुण ३७.३०,२००/-रु.कि.चा ६५.५ तोळे (६५५ ग्रॅम) १०० टक्के असा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणुन गुन्हे शाखा युनिट-५ ची उल्लेखनिय कामगिरी सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे, गुन्हे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे र. श्री नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-4कडील पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, चैताली गपाट, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, आश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, दिपक लांडगे, प्रमोद टिळेकर, चेतन चव्हाण, शहाजी काळे, विनोद शिवले, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, किशोर पोटे, शशिकांत नाळे, राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे, विलास खंदारे, अकबर शेख, अमित कांबळे, स्वाती गावडे, तृप्ती झगडे व संजयकुमार दळवी यांनी कामगिरी केली आहे.

Releated Posts

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByBymnewsmarathi Jan 22, 2026

बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये आढळला!!

प्रतिनिधी बीड येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कार्यरत राज्य कर निरीक्षक सचिन नारायण जाधवर (वय ३५)…

ByBymnewsmarathi Jan 18, 2026