मुख्य मजकुरावर जा
Sunday, 23 August 2026

प्रोग्रेसिव ब्रीडर्स फार्मर असोसिएशनतर्फे (PBFA) सांगोला येथे ‘मिशन प्रॉफिट’ शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न वाकी येथील औदुंबर राजकुमार खैरे यांचा विशेष सन्मान

प्रतिनिधी दिनांक: २२ ऑगस्ट २०२६दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन दुग्ध व्यवसाय अधिक नफा देणारा (प्रॉफिटेबल) बनवण्याच्या उद्देशाने प्रोग्रेसिव ब्रीडर्स फार्मर असोसिएशन (PBFA)…

mnewsmarathi वार्ताहर
August 23, 2026 1 मिनिट वाचन 67 वाचन

प्रतिनिधी
दिनांक: २२ ऑगस्ट २०२६दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन दुग्ध व्यवसाय अधिक नफा देणारा (प्रॉफिटेबल) बनवण्याच्या उद्देशाने प्रोग्रेसिव ब्रीडर्स फार्मर असोसिएशन (PBFA) च्या वतीने सांगोला येथील सूर्योदय मॉल येथे ‘मिशन प्रॉफिट’ दूध उत्पादक मार्गदर्शन शेतकरी मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला सोलापूर, बारामती आणि परिसरातील शेकडो पशुपालक व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्यात दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय आणि प्रगतशील कामगिरी केल्याबद्दल बारामती तालुक्यातील वाकी येथील ‘औदुंबर डेअरी फार्म’चे संचालक श्री. औदुंबर राजकुमार खैरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘सूर्योदय दूध’ विशेष स्मृतीचिन्ह (ट्रॉफी) देऊन त्यांना गौरविण्यात आले. औदुंबर खैरे यांनी आधुनिक पद्धतींचा वापर करून आपल्या डेअरी फार्मच्या माध्यमातून निर्माण केलेला आदर्श इतर तरुण शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.मान्यवरांचे मार्गदर्शन व उपस्थिती:प्रमुख मार्गदर्शक: ‘ॲडव्हान्स एन्झाईम टेक्नॉलॉजी लि. मुंबई’चे आंतरराष्ट्रीय विक्री व्यवस्थापक डॉ. शैलेश मदने यांनी जनावरांचे आरोग्य, संतुलित आहार नियोजन आणि दुधाची गुणवत्ता वाढवणे याविषयी शेतकऱ्यांना सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषण: प्रोग्रेसिव ब्रीडर्स फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संजय सालगुडे पाटील यांनी ‘मिशन प्रॉफिट’ या मोहिमेमागची भूमिका स्पष्ट करत, शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धती बदलून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले.प्रमुख उपस्थिती: सूर्योदय दूध (सांगोला) चे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे आणि PBFA चे सचिव श्री. रामनाथ वदक यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी असोसिएशनचे खजिनदार श्री. वामन गायकवाड, सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. श्री. राजू पांढरे, उपाध्यक्ष श्री. महावीर साळवे, उपाध्यक्ष श्री. सौरभ मासाळ आणि उपाध्यक्ष श्री. राजकुमार दळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कार विजेते औदुंबर राजकुमार खैरे यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात आलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी दर्जेदार पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा