मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

बारामती! होळमध्ये ऊस उत्पादकांची ‘शाळा’; हुमणीसह कीड-रोग व्यवस्थापनावर कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

mnewsmarathi 24 Aug 2026 1 मिनिट वाचन 3,754 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने बारामती तालुक्यातील होळ येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस पीक मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी श्री.सचिन हाके व मंडळ कृषी अधिकारी श्री. झंजे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात ऊस पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश उबाळे, डॉ. किरणकुमार ओंबासे, डॉ. राजेंद्र पांढरे तसेच पुणे कृषी महाविद्यालयाचे डॉ. नजीर तांबोळी व डॉ. विकास भालेराव यांनी ऊस पिकाचे व्यवस्थापन, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी नाना फरांदे यांनीही उपस्थित शेतकरी बांधवांशी ऊस उत्पादनातील अनुभव व विविध बाबींवर संवाद साधला.

कार्यक्रमादरम्यान कृषी तज्ज्ञांनी काही शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी ऊस पिकामध्ये झालेल्या हुमणीच्या प्रादुर्भावाची पाहणी करून त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकावरील समस्या प्रत्यक्ष शेतात समजून घेण्याची संधी मिळाली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे श्री. जाधव व श्री. लोणकर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. तसेच बारामती पंचायत समितीच्या सदस्य श्रीमती आशा वायाळ, प्रगतशील शेतकरी व उपसरपंच रमेश वायाळ, लालासाहेब होळकर, तानाजी वायाळ, दत्तात्रय वायाळ, गोरख मिंड, अभिजीत वायाळ, किशोर कारंडे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

बारामती कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्याही या कार्यक्रमास उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आयोजन उपकृषी अधिकारी श्री. माने व सहाय्यक कृषी अधिकारी मिथुन बोराटे यांनी केले. ऊस पिकातील कीड व रोग व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांकडून मिळालेल्या प्रत्यक्ष मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi