मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 29 August 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

वाघोलीत गोदामाचे शटर उचकटून घरफोडी; दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने केली ३ जणांना बेड्या, २ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 29, 2026 1 मिनिट वाचन 3,528 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदामाचे शटर उचकटून सिगारेट बॉक्स चोरी करणाऱ्या तिन्ही आरोपींना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ ने ठाणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल २,००,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वाघोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिेता कलमानुसार घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. फिर्यादी श्री. महेंद्र पुखराज चौधरी यांच्या मालकीच्या आर्डन प्लास्टीक, वाघोली गावठाण येथील गोदामाचे शटर १८/०८/२०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी उचकटून एकूण ५,५७,२९०/- रुपये किमतीचे सिगारेटचे बॉक्स चोरी केले होते.

वरिष्ठांच्या आदेशानुसार दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळासह आजूबाजूच्या परिसरातील तब्बल ११५ हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपींनी गुन्ह्यासाठी रिक्षाचा वापर केल्याचे व ते एक्सप्रेस हायवेने ठाण्याच्या दिशेने पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.

​पथकाने बातमीदारांमार्फत माहिती मिळवून खालील तीन आरापींना ताब्यात घेतले:

​इर्शाद चालक: वसीम इकरार खान (रा. खराडी, मुंब्रा, जि. ठाणे)

​प्रत्यक्ष चोरी करणारा: साहिल मोजालिन पटेल (वय २२ वर्षे, रा.साई चाळ, भिवंडी पश्चिम, ठाणे, मूळ रा. बदायू, उत्तर प्रदेश)

​चोरीचा माल विकत घेणारा: इम्तियाज लियाकत घोडके (वय ४५ वर्षे, रा. वसंत विहार, ठाणे, मूळ रा. बलसाड, गुजरात)

​चौकशीत त्यांनी हा चोरीचा माल कल्याण-शिळरोड येथील एक्सप्रेस मॉलसमोरील पान शॉपचे मालक रफि निशाद यास विकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन २,००,०००/- रुपये किमतीचे सिगारेट जप्त केले आहेत. आरोपी इम्तियाज घोडके याच्यावर यापूर्वीही गुजरात राज्य व ठाणे जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर धडाकेबाज कारवाई पुणे शहरचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त श्री. हसन गोहर, व पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. राज कुमार शिर्के, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण, तसेच दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ चे अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख