बारामती ! सस्तेवाडी गावामध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम व शिवजयंती उत्साहात साजरी.

Uncategorized

(सस्तेवाडी) प्रतिनिधी – फिरोज भालदार

सस्तेवाडी ता. बारामती येथील शिवशक्ती प्रतिष्ठान च्या वतीने सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जावेत म्हणून सामान्य ज्ञान स्पर्धा , विठ्ठल महाराज फडके यांचे शिवचरित्र व्याख्यानमाला, आयोजित केले होते .

यावेळी लहान मुला मुलींनी आपले कला गुण सादर केले यात पोवाडा , कविता, गाणी व छत्रपती शिवाजी महाराजांन विषयी आपले मनोगत व्यक्त केली व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले . शिवज्योत प्रस्थान किल्ले पुरंदर ते सस्तेवाडी आणण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजन करून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली . तसेच येणाऱ्या काळात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणार असल्याचे शिवशक्ती प्रतिष्ठान सस्तेवाडी वतीने सांगण्यात आले .

यावेळी सरपंच बापू ठोंबरे, उपसरपंच शोभा मोरे , पै. विकास भाऊ जाधव, अध्यक्ष शिवाजी साळुंखे व मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष उपस्थित होते . सहकार्य सुशांत साळुंखे, नितीन साळुंखे ,युवराज मोरे ,रोहन गाडेकर सुरज जगदाळे ,संभाजी जगदाळे , नवनाथ मोरे, शुभम साळुंखे ,बापू ढोणे ,पुरुषोत्तम ढोणे, आणि सर्व ग्रामस्थ सस्तेवाडी .या कार्यक्रमात ग्रामस्थांची देखील प्रचंड असी कार्यक्रमासाठी उपस्थिती होती