काऱ्हाटी व मुढाळे येथील जिओ नेटवर्क ग्राहकांच्या सेवा विस्कळीत ग्राहक नाराज.

Uncategorized

प्रतिनिधी मुढाळे – विजय गायकवाड.

आजच्या काळात मोबाईल ही मोठी गरजेची गोष्ट बनली आहे. त्यातच काऱ्हाटी गाव जाधव वस्ती इतर ठिकाणी मुढाळे ता. बारामती येथे जिओ नेटवर्क ग्राहकांना सेवांमध्ये अनेक समस्या येत आहेत.घरामध्ये नेटवर्क कमी येणे ,कॉल न लागणे, चालू कॉलचा अचानक आवाज जाणे,कॉल अचानक बंद होणे,इंटरनेट डाउनलोडिंग मध्ये समस्या येणे,नेटवर्क क्षेत्राबाहेर सांगणे अशा अनेक समस्यांना जिओच्या नेटवर्क ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे.अशा अडचणी काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर येत आहेत. जिओ ग्राहकांनी जिओच्या संबंधित सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकारी यांच्याकडून ग्राहकांला आलेले उत्तर पंधरा दिवस लागतील काम चालू आहे . अशी उत्तरे मिळाली मी तुमची तक्रार वरिष्ठांना पाठवली आहे पंधरा दिवसात तुमची समस्या दूर होईल अशी उत्तरे मिळाली. ग्राहकांनी त्यांना त्यांच्या वरिष्ठांचा नंबर मागितला असता त्यांनी देता येत नाही असे उत्तर दिले .

रिचार्ज आज संपला की तुम्ही वेळेवर सेवा बंद करता. तसेच सेवा चालू करण्यास एवढा वेळ का ? हा प्रश्न ग्राहकांला पडला आहे . सेवांचे किंमत देत असतो तसेच तुम्ही पण आम्हाला अशा सेवा त्वरित उपलब्ध करून दिली पाहिजे असे ग्राहकांच्यात चर्चा आहे .तुम्ही पंधरा दिवस सांगत आहात .तसे तुम्ही रिचार्जची वेळ पंधरा दिवस वाढवून देता का ? हे विचारले तर त्यांचे उत्तर आले आमच्या कंपनीची पॉलिसीत नाही. असे उत्तर मिळाले . रिचार्ज संपल्यानंतर लगेच तुम्ही सेवा बंद करता. तसेच सेवा बंद झाल्या की लगेच तुम्ही सर्व सेवा सुरळीत चालू करून द्याव्यात अशी जिओ नेटवर्क कंपनीला ग्राहकांची विनंती आहे.