वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार
(बारामती ता. ) वडगाव निंबाळकर येथे शनिवार दिनांक 25/ 2 /2023 रोजी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते . यामध्ये प्रमुख वक्ते प्रा. सचिन झगडे (सत्यशोधक विचारवंत ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आर्थिक परराष्ट्र, शेती , महिला यांचे विषयी धोरण एक विश्लेषण मांडण्यात आले . व्याख्यानाचे उद्घाटन मा. संतोष शेंडकर पत्रकार दैनिक सकाळ यांनी केले.
यावेळी अध्यक्षता म्हणून बाळासाहेब मिसाळ पाटील (संरक्षण छत्रपती क्रांती सेना महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ व जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांनी केले होते. व्याख्यानाला वडगाव निंबाळकर ग्रामस्थांची उपस्थिती देखील जास्त प्रमाणात होती.
यावेळी वडगाव निं. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,सदस्य व आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाची प्रस्ताविका डॉक्टर प्रशांत साळवे यांनी मांडली व सूत्रसंचालन डॉक्टर भरणे यांनी केले आभार डॉक्टर प्रवीण जगताप यांनी मानले .