कोयतेची पोस्ट कारवाई फस्ट 

क्राईम

प्रतिनिधी

कोयता गॅंग हा शब्द अलीकडच्या काळात खूप ठिकाणी चर्चेला जातो कोयता जवळ बाळगणे ,कोयता फिरवणे, कोयता घेऊन धुडगूस घालणे, आणि कोयतेचा डीपी ठेवणे या घटना आपण वारंवार पाहतो या घटनांमधून नेहमीचा गुन्हा तर आहेच परंतु समाजामध्ये दहशत निर्माण करणे समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेलाच हात घालणे

इरादा दिसून येतो त्यातून त्याची गुन्हेगारी मनोवृत्ती दिसून येते त्यामुळे अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी हे सक्त कारवाई करण्याचे आदेश देत असतात अलीकडे कोयत्याचे डीपी किंवा इतर हत्यारा सहित डीपी ठेवण्याचे प्रकार वाढल्याने सोशल मीडिया सेल व सायबर क्राईम विभागातर्फे अशा घटनांवर सतत लक्ष असते ग्रुपमधील काही बातमीदार , पोलीस तसेच पोलिसांचे खबरे हे पोलिसांना याबाबत माहिती देतात याच प्रकारची माहिती माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल यांना मिळाली arpit_mohite_king_of_baramati या instagram आयडीवरून कोयत्यासह एका युवकाचा फोटो ठेवला आहे त्यांनी तात्काळ सदरची पोस्ट बारामती शहर पोलिसांना फॉरवर्ड करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तात्काळ कारवाईबाबत पाठपुरावा केला पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके पोलीस अंमलदार दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर दशरथ इंगवले आकाश सीताफ शाहू राणे यांनी तात्काळ इंस्टाग्राम वर कोयत्यासह आपला फोटो ठेवणाऱ्या इसमाचा शोध घेतला सदर इसम अर्पित सचिन मोहिते वय 22 वर्षे राहणार एसटी स्टँडच्या पाठीमागे इंदापूर रोड याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता हौस म्हणून त्याने चार वर्षांपूर्वी काढलेला कोयत्या सोबतचा फोटो क्रेज म्हणून स्वतःच्या इंस्टाग्राम वर ठेवला पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 4 ,25 प्रमाणे कारवाई केली व त्या ठिकाणी घरात वळचणीला ठेवलेला कोयता पोलिसांनी जप्त केला सदरची पोस्ट डिलीट केली आणि या प्रकारे बारामती शहरांमध्ये कोणाच्याही डीपीवर गुन्हेगारी मजकूर, हत्यारे, खुन्नस शब्द याबाबतचे डीपी दिसून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.