वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार
महागाईने सर्वसामान्य लोकांना आणि गृहिणींना मोठा झटका दिला आहे . मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी खिशाला कात्री लागली ही चर्चा आता सध्या सगळीकडे चालू आहे . या बातमीनंतर तर गृहिणींचे बजेट चांगलंच कोलमाडणार आहे.
यामध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली असून 14.21 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये झाली आहे. यापूर्वी जूलै 2022 मध्ये देखील सिलेंडरच्या दारात 50 रुपयांनी वाढ झालेली होती. याचबरोबर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ही भरपूर प्रमाणात वाढ झालेली दिसुन येत आहे त्याची किंमत तब्बल 350.50 रुपयाने वाढलेली आहे .
होळीच्या अगोदर सर्वसामान्य लोकांना पुन्हा एकदा महागाईचा झळा बसला असून घरी स्वयंपाक करून जेवणे आणी रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवणे हे दोन्ही आता महागले आहेत . जर 50 ,100 रुपयांनी अशीच जर एलपीजी गॅस मध्ये वाढ होत राहिली तर गृहिणींना चुलिसमोर फुकणीने फुकत फुकत स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय नाही .