बारामती! राजे उमाजी नाईक विकास महामंडळाच्या निर्णयाचे वडगांव निंबाळकर मध्ये स्वागत.

Uncategorized

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार

राज्याच्या अर्थ संकल्पात राजे उमाजी नाईक यांच्या नावाने रामोशी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केल्याबद्दल वडगांव निंबाळकर ता.बारामती येथे रामोशी समाजाचे कार्यक्षम जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे भरवुन आंनदोउत्सव साजरा करण्यात आला.


या विकास महामंडळामधून महिला बचत गट,सुशिक्षित बेरोजगार मुलां-मुलींना सहज कर्ज उपलब्ध करून स्वतः चा व्यवसाय करण्यास मददत होणार आहे.
स्वातंत्र्य काळापासुन रामोशी समाज शासनाकडे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे याबाबत सतत मागणी करत होता. जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतराव शितोळे आणि सहकाऱ्यांनी याबाबत सतत पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आल्याने राज्यभरातील रामोशी समाजाने समाधन व्यक्त केले आहे.


तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार देखिल व्यक्त करण्यात आले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने,तालुका अध्यक्ष महेंद्र भंडलकर,पुणे जिल्हा संघटक अलकाताई भंडलकर,महिला तालुका अध्यक्ष उर्मिलाताई मदने,पुणे जिल्हा संघटक पांडुरंग घळगे,सामाजिक कार्यकर्ते अर्जुन खोमणे,बाळासो खोमणे सर,नंदकुमार जाधव,आण्णासो मदने,सोनु खोमणे,आप्पा भंडलकर,बापुराव भंडलकर,मेजर दिलिप ठोंबरे,सतिश साळवे,चेतन साळवे,बाबुराव चव्हाण,साक्षी भंडलकर,पप्पु भंडलकर,बाबु चव्हाण,वसंत आगम,ढोबळे मामा,दादा शिंदे,राजु शिंदे,विशाल साळवे,आदित्य चव्हाण,सौरभ खोमणे,अमर चव्हाण आदि पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते..