• Home
  • माझा जिल्हा
  • जवाहर एजयुकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडनूकीचा मार्ग मोकळा 
Image

जवाहर एजयुकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडनूकीचा मार्ग मोकळा 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

आ.धनंजय मुंडे मार्गदर्शनाखाली बारा वर्षाच्या न्यायालयीन लढाईला यश- प्रदीप खाडे

 जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असुन धर्मादाय उपायुक्त बीड यांनी निवडणुक अधिकारी नेमत जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणुक घेण्याचे आदेश दिल्यानंतर आ.धनंजय मुंडे मार्गदर्शनाखाली अर्जदार प्रदिप खाडे यांनी परळी शहरात ठिकठिकाणी फटाके वाजवत पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

        जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणुक बारा वर्षापुर्वी झाली होती. 2009 पासून 468 जणांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी सभासदची न्यायलयीन लढाई सुरु होती.माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिवअप्पा मुंडे,प्रदीप खाडे यांनी बीड येथील सहधर्मादाय आयक्त न्यायलयीन लढा सुरू करून समोरील गटाचे 2010 निवडूनकीनंतर सर्व बोगस चेंज रिपोर्ट न्यायलयीने फेटाळून लावून प्रदीप खाडे यांचा ४१(अ) चा अर्ज वैद्य ठरवून जवाहर एजयुकेशन सोसायटीची संचालक मंडळाची निवडणुक घेण्याचे आदेश दिल्याने निवडूनक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच निवडूक कार्यक्रम जाहिर होणार आहे.या न्यायलयीन लढाईचे कामकाज ऍड. सतीश काळमपाटील यांनी पहिले. तसेच प्रदीप खाडे यांना ज्येष्ठ प्रा. सदाशिवअप्पा मुंडे व प्रा.डॉ.पी.एल. कराड यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यावर परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, वैद्यनाथ महाविद्यालय, राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे फटाके फोडून, पेढे भरून जलोष करत आंनदोत्सव साजरा केला. यावेळी प्रदीप खाडे, सुरेश नाना फड, प्रा. डॉ. पी. एल. कराड, प्रा. हरिष मुंडे, गोविंद मुंडे, प्राचार्य अतुल दुबे, प्रा.शंकर कापसे, प्रा. किरण शिंदे, प्रा.शेख अली,दगडू भाळे, सुरेश नरवटे, प्रा. शेख इरफान जयराज देशमुख, भोयटे आण्णा, विष्णू शिंदे व इतर उपस्थित होते.

 

   परळी परिसरात अल्पवधीतच अनेक शाळा महाविद्यालय नाथ शिक्षण संस्थेमध्ये घेऊन परळीतील शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था म्हणून जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ महाविद्यालय आ. धनंजय मुंडे साहेब यांच्या ताबात येत आहे. प्रदीप खाडे यांनी सदाशिवअप्पा मुंडे, प्रा. डॉ. कराड यांच्या सहकार्यने न्यायालयीन लढाई बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर व मंत्रालय पर्यंत न्यायलयीन व सर्व कामकाज आज हा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निवडूणक जाहीर होऊन आ.धनंजय मुंडे यांचा शिक्षण क्षेत्रात परळी पॅटर्न होत आहे. यामागचे किंगमेकर प्रदीप खाडे यांना यश आले आहे.

स्व.पंडितअण्णा मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करता आले-प्रदिप खाडे

   बारा वर्षापुर्वी आ.धनंजय मुंडे साहेब जवाहर एज्युकेशन सोसायटीवर असावेत अशी इच्छा स्व.पंडितअण्णा मुंडे यांनी बोलुन दाखविली होती.त्यानंतर आम्ही 12 वर्षे न्यायालयीन लढाई लढली आज गुढीपाढव्याच्या दिवशी आम्हाला यश प्राप्त झाले असुन नव्या वर्षात आ.धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जवाहर एज्युकेशन सोसायटी शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय लिहिणार असुन स्व.पंडितअण्णा मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करता आले याचे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया अर्जदार प्रदिप खाडे यांनी व्यक्त केली.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026