मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

रिपब्लिकन पक्ष वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू- दादासाहेब ओव्हाळ 

mnewsmarathi 16 Mar 2023 1 मिनिट वाचन 8,607 वाचन

प्रतिनिधी

सातारा: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकासाठी भारतीय संविधान दिलं आणि वंचित घटकातील लोकांना जगण्याचा मूलमंत्र दिला त्याचप्रमाणे जगण्यासाठी दिशा देणारा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए दिलेला आहे आणि त्यामुळेच रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की वंचित घटकापर्यंत रिपब्लिकन पक्षाची विचारधारा पोचवणं व चित शोषित पीडित घटकाला प्रवाह बरोबर घेऊन न्याय हक्कासाठी लढण्याकरता बळ देणारी पाऊच निर्माण करणे हेही रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे काम आहे

जिल्हा संपर्क कार्यालय येथे अनेक जणांचा रिपब्लिकन पक्षांमध्ये प्रवेश झाला त्याचवेळी दादा अर्जुन गायकवाड यांची सातारा तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए जिल्हा संपर्क कार्यालय सातारा येथे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष मा.दादासाहेब ओव्हाळ यांच्या आदेशाने मा.दादा अर्जुन गायकवाड यांची सातारा ता.युवक कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

यावेळी मा.दादासाहेब ओव्हाळ जिल्हाध्यक्ष सातारा, पश्चिम महा.युवक उपाध्यक्ष सुरेश पवार, वाहतूक जिल्हाध्यक्ष नानासाहेब ओव्हाळ, वाहतूक ता.अध्यक्ष राकेश जाधव,महिला जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे,खेड ग्रामपंचायत सदस्य अजित गायकवाड, जिल्हा संपर्कप्रमुख किरण ओव्हाळ,ता. कार्याध्यक्ष योगेश माने,अतुल गरड,समाधान खुडे,बापू गायकवाड,शिवाजी पवार,सतीश खुडे,महादेव पारधे,प्रकाश गायकवाड,अवि खंडागळे,सुनील गायकवाड,प्रवीण कांबळे,उमेश गायकवाड,भैय्या क्षीरसागर,रामभाऊ दादा,पप्पू जाधव इत्यादी असंख्य कार्यकर्ते यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi