मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 05 April 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

कुळकजाई येथे शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
April 5, 2023 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

दहिवडी प्रतिनिधी
कोमल काळे
कुळकजाई येथे शिवसेना ठाकरे गटाची बैठक घेण्यात आली. शिवसेनेला संपवण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना जागा दाखवू असा इशारा शेखरभाऊ गोरे यांनी दिला आहे. जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी आहेत.सत्तेसाठी काहीजणांनी शिवसेनेला संपविण्याचा घाट घातला होता मात्र यावेळी निष्ठावंत शिवसैनिक खंबीरपणे ठाकरे कुटुंबियांच्या पाठीशी उभा असून येणाऱ्या काळात शिवसेनेला संपविण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब व सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शेखरभाऊ गोरे यांनी केले आहे.


कुळकजाई ता. माण येथे शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख
शेखरभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक पार पडली

याप्रसंगी सातारा जिल्हा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख,जिल्हासंघटक , महिला जिल्हा संघटिका व युवासेना जिल्हा प्रमुख आधी पदाधिकारी उपस्थित होते .शेखरभाऊ गोरे म्हणाले जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करतात . पक्षाच्या कार्यकर्त्याला अडचण येईल त्याठिकाणी आपण सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख