• Home
  • इतर
  • मुंढवा पोलीस ठाणेची पंधरवाडयात तिसरी मोठी कामगिरी पीएमटी बस मध्ये गर्दिचा फायदा घेवून प्रवाशांचे मोबाईल चोरणा-या चोरटयांना केले जेरबंद आरोपकडुन तब्बल २,७०,०००/- रु किमतीचा मुददेमाल केला जप्त
Image

मुंढवा पोलीस ठाणेची पंधरवाडयात तिसरी मोठी कामगिरी पीएमटी बस मध्ये गर्दिचा फायदा घेवून प्रवाशांचे मोबाईल चोरणा-या चोरटयांना केले जेरबंद आरोपकडुन तब्बल २,७०,०००/- रु किमतीचा मुददेमाल केला जप्त

प्रतिनिधी.

याबाबत सविस्तर बातमी अशी की दिनांक २७/०४/२०२३ रोजी मा वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री लकडे सो व क्राईम पोलीस निरीक्षक श्री काकडे सो यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणे तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक संदीप जोरे व स्टाफ असे मुंढवा पोलीस दाखल मोबाईल चोरीच्या गुन्हा रजि नं १३९ / २३ भा द वी ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना मुंढवा तपास पथकातील पोलीस हवालदार ७३२ दिनेश राने व

पोलीस हवालदार ४१५७ महेश पाठक यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम मुंढवा रेल्वे बीज खाली चोरीचे मोबाईल विक्रीसाठी रिक्षातुन घेवुन येणार आहेत. सदरची बातमीची खात्री करुन सदरची बातमी मुंढवा वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे सो यांना कळवुन त्यांनी तात्काळ पुढील कारवाईचे आदेश दिले. मुंढवा तपास पथक अधिकारी श्री संदीप जोरे सपोनी व स्टाफ यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे हर्षल मनोज पांचाळ वय २१ वर्षे व त्याचा साथिदार नामे इम्रान ताज शेख वय २२ वर्षे दोघे रा सर्वोदय कॉलनी मुंढवा यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे असणारे रिक्षाचे समोरील डीकीमध्ये वेगवेगळया कंपनीचे एकुण १,७०,०००/- रु किमतीचे एकूण १५ मोबाइल मिळुन आले. सदर मोबाईलमध्ये मुढवा पोलीस ठाणे गुर नं १३९ / २०२३ मा द वी ३७९ मधिल चोरीस गेलेला मोबाईल मिळुन आला. सदर मोबाईल आरोपी यांनी मुंढवा चौकातुन शेल पंपाजवळील बस स्टॉपवरुन चोरल्याचे सांगितले. त्यांचेकडे मिळुन आलेल्या इतर मोबाईल बाबत चौकशी केली असता त्यांनी ते केशवनगर बस स्टॉप मुंढवा मधिल बस स्टॉप तसेच चंदननगर मधिल व हडपसर मधिल पीएमटी बस स्टॉप वरुन चोरल्याचे सांगितले आहे. बाकी जप्त करण्यात आलेले १५ मोबाईल चे तांत्रिक विश्लेषण करुन पुढील कारवाईची तजवीज ठेवलेली आहे. आरोपींकडे सखोल चौकशी चालु असुन अधिक मोबाईल मिळण्याची शक्यता आहे.

सदरची कामगीरी मा. श्री रीतेशकुमार साो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णीक सो, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. श्री विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. श्री बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे श्री प्रदिप काकडे पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा तपास पथकाचे अधिकारी संदिप जोरे, सहा. पोलीस निरीक्षक, व तपास पथकातील नेमणुकीस असणारे पोहवा / ७३२ दिनेश राणे पोहवा / ४१०२ भांदुर्गे, पोहवा / ४६३८ वैभव मोरे व पोहवा / ४१५७ महेश पाठक पोना ६७०४ राहुल मोरे पोशी / ४४४१ स्वप्नील रासकर, पोशी ८१४३ सचिन पाटील यांनी केली आहे.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025