प्रतिनिधी.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय अंकित गोयल यांनी सर्व छोटे मोठे अवैध धंदे वर कारवाई करून ते बंद करावे याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे त्यांच्या आदेशाची तंतोतंत पालन होईल याबाबत पाठपुरावा करत आहेत
बारामती शहर पोलिसांनी काल अवैध दारू व जुगार ठिकाणावर छापे मारले त्यावेळेस अवैधपणे दारू गुत्ते चालवणारे महिला नामे सुशीला सुखदेव धोत्रे वय 37 वर्ष लिमटेक हिच्या कडून 35 लिटर गावठी हातभट्टी दारू रेश्मा सोपान बागाव राहणार भिमरत्न नगर जळोची तिच्याकडून 35 लिटर गावठी हातभट्टी दारू राजेंद्र लक्ष्मण बोरकर याच्या दुकानातून गुणवडी मधून देशी दारू बाटल्या एकूण 15 बाटल्या जप्त केलेले आहेत. तसेच मटका चालक निलेश रामचंद्र शिंदे प्रबुद्ध नगर अमराई कल्याण मटका नावाचा जुगार साधने रोख रक्कम 510 सह मिळून आल्याने त्याच्यावरही कारवाई केलेली आहे सर्वांना पोलिसांनी अटक केलेली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये पोलीस नाईक कोळेकर पोलीस शिपाई इंगोले पोलीस शिपाई दत्तात्रय जामदार शाहू राणे महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया कांबळे यांनी केलेली आहे