वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार
वडगाव निंबाळकर व ठिकठिकाणी निरा- बारामती रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण ची कामे केले आहे. मात्र, रस्त्यावर टाकलेले गतिरोधक अपघातांना निमंत्रण देत आहेत. गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने पांढरे पट्टे मारण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नियमानुसार न बनवलेल्या गतिरोधकांमुळे प्रवाशांचे मणके ढिले होत आहेत. रस्ता चांगला झाल्याने वाहनचालक वेगाने वाहने चालवत आहेत. मात्र, गतिरोधकाचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ढोलेवस्ती ते वडगाव पोलिस स्टेशनपर्यंत रस्ता करण्यात आला आहे . गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक टाकले. मात्र त्यावर पांढरे पट्टे नसल्याने अपघातात वाढ झाली आहे.
निरा- बारामती या मार्गावर सर्वाधिक वाहतुक चालू आहे. मात्र,सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील पुलांची कामे दर्जेदार केल्याने वाहनचालक समाधानी आहेत. नीरा – बारामती मार्गावर सर्वाधिक गतिरोधकही आहेत. रहदारीची ठिकाणे, शाळा-महाविद्यालये या ठिकाणी गतिरोधक असणे गरजेचे आहे. मात्र, त्याची उंची कमी असावी आणि ते नियमानुसार असावेत, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. वडगाव निंबाळकर नीरा – बारामती रोड ची कामे झाल्यामुळे वाहने ही जोरदार वेगाने येतात व गतीरोधकांला पांढरे पट्टे नसल्यामुळे गतीरोधकाचा अंदाज न आल्याने अचानक ब्रेक दाबली जातात व अपघात होतात . यामुळे शाळा – कॉलेजच्या विद्यार्थी , शिक्षक व ग्रामस्थांमध्ये या गतिरोधकांमुळे भीती निर्माण होत आहे .
वडगाव निंबाळकर येथे बनवलेल्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे कधी मारनार ? का कोणाचा जीव गेल्याशिवाय पांढरे पट्टे मारणार नाही?. अशी चर्चा वडगाव निंबाळकर ग्रामस्थांमध्ये होत आहे.