प्रतिनिधी
सोयगाव, तीन ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकी साठीं मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्या नामनिर्देशन पत्रांची बुधवारी( ता.०३)छाननी दरम्यान सहाचे सहा नामनिर्देशन पत्र वैद्य असल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत तायडे यांनी दिला आहे.सोयगाव तालुक्यात तीन ग्रामपंचायती साठी पोट निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे.
चार जागांसाठी सोयगाव तालुक्यातील तीन ग्रामपंचायती साठी पोट निवडणूक लागू झाली आहे..
पोट निवडणूक लागू झालेल्या कवली ग्रामपंचायतच्या दोन जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत एकही अर्ज प्राप्त न झाल्याने कवली ग्रामपंचायती साठी मतदान होणार नसल्याचे मंगळवारी शिक्कामोर्तब झाले तर उर्वरित दस्तापुर आणि नांदगाव तांडा या दोन्ही ग्रामपंचायत साठी (ता.०२) ,एका जागेसाठी प्रत्येकी तीन असे सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहे त्यामुळे या दोन ग्रामपंचायत चे चित्र माघारीच्या दिवशी स्पष्ट होईल दस्तापुर ग्रामपंचायती साठी एका जागेसाठी तीन व नांदगाव तांडा ग्रामपंचायत साठी एका जागेसाठी तीन याप्रमाणे सहा अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी हेमंत तायडे यांनी दिली आहे
——–ग्रामपंचायत पोट निवडणुकांसाठी सोमवारी( ता. ०८) उमेदवारी अर्जं माघारी साठी मुदत आहे त्यामुळे माघारी नंतरच या दोन्ही ग्रामपंचायत चे चित्र स्पष्ट होईल दरम्यान दोन्ही ग्रामपंचायत चे जागा सर्वसाधारण साठी राखीव आहे त्यामुळे चुरस वाढली आहे नांदगाव तांड्यात मोठी चुरस होईल असे चित्र आहे…