प्रतिनिधी – फिरोज भालदार
राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान सस्तेवाडी आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव निमित्त शुक्रवार दि. 2 / 6/ 2023 रोजी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित ठेवण्यात आले होते. या कार्यक्रम रूपरेषा अशी करण्यात आली होती. शुक्रवार दि. 2/ 6/ 2023 रोजी सकाळी 8 वाजता ज्योत आणण्यासाठी प्रस्थान महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा देवस्थान जेजुरी येथून ज्योत आणण्यात आली . दुपारी 2 वाजता रॅली काढत सस्तेवाडी गावामध्ये ज्योतीचे आगमन करण्यात आले. 4 वाजता ढोल, ताशा ,हलगी, डीजे व आकर्षण अश्या रथ , फटाक्यांच्या भव्य अश्या आतिशबाजी मध्ये जंगी अशी मिरवणूक काढण्यात आली .
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. व किर्तन सेवा समाज प्रबोधनकार माननीय निलेश महाराज कोरडे यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वासराव देवकाते( नाना पाटील) माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संभाजीनाना होळकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती तालुका हे होते . सन्माननीय उपस्थिती म्हणून अभी काका देवकाते पाटील प्रदेश सरचिटणीस भा.भ. वि.यु.आ , माणिकराव काळे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुरुषोत्तम ढोणे ढोणे इलेक्ट्रिकल अँड कॉन्ट्रॅक्टर, विकास भाऊ जाधव युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवनाथआबा मगर युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच ग्रामपंचायत सस्तेवाडी बापूराव ठोंबरे, उपसरपंच ग्रामपंचायत वैजंताताई टकले, शोभाताई मोरे मा उपसरपंच ग्रामपंचायत , मा उपसरपंच ग्रामपंचायत पूजाताई साळुंखे, सदस्य ग्रामपंचायत विद्याताई आवटे, किरण कदम सदस्य ग्रामपंचायत , प्रवीण कारंडे सदस्य ग्रामपंचायत , भीमाताई टकले सदस्य ग्रामपंचायत , योगेश सस्ते ग्रामपंचायत सदस्य , राणी कदम पोलीस पाटील , आनंदराव होळकर तंटामुक्ती अध्यक्ष, यांच्या उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजक राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान सस्तेवाडी ता. बारामती जि. पुणे यांनी चांगला रित्या व शांततेत हा कार्यक्रम पार पाडला.