मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 09 October 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप करीत एम न्युज मराठीचा प्रथम वर्धापन दिन साजरा.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 9, 2023 1 मिनिट वाचन 8,504 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

 एम न्यूज मराठी या न्यूज पोर्टलचा प्रथम वर्धापन दिन नींबूत येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व वही वाटप करून संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन एम न्यूज मराठी टीम च्या वतीने प्राथमिक शाळा नींबूत येथे अकरा वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अभिजीत भैय्या काकडे, युवकांचे आशास्थान श्री गौतम भैया काकडे, बा. सा. काकडे विद्यालयाचे सचिव श्री मदनराव काकडे, माजी सरपंच राजकुमार बनसोडे, शिवाजीराव काकडे, विलासराव बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य शिरीष भैया काकडे, ग्रामपंचायत निंबूचे उपसरपंच अमर भैया काकडे, विक्रम काकडे, चंद्रजीत काकडे, भाऊसो कोळेकर, ग्रामसेवक काळभोर, प्रसाद सोनवणे, दत्तात्रय सूर्यवंशी, किरण सूर्यवंशी, सुमित काकडे, विनोद गोलांडे, मोहम्मद शेख, संभाजीराव काकडे, विजयराव लकडे,शाळेच्या मुख्याध्यापिका बालगुडे मॅडम, शेंडकर मॅडम, अनपट सर, जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड पत्रकारिता करून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम न्यूज मराठीच्या माध्यमातून केले जात आहे असे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश फरांदे यांनी केले तर आभार ऋतुजा मधुकर बनसोडे हिने मानले

 तसेच वडगाव निंबाळकर येथे देखील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही व खाऊ वाटप करीत एम न्यूज मराठी न्यूज पोर्टलचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने, पत्रकार अमोल गायकवाड , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहूल जाधव , उपाध्यक्ष सुशीलकुमार अडागळे , भारतीय मराठी पत्रकार संघ उपाध्यक्ष सुनील जाधव , उपक्रमशील शिक्षक अनिल गवळी, मुख्याध्यापिका सौ .विजया दगडे,सहकारी शिक्षिका सुरेखा मगदूम,मालन बोडरे,सुनिता पवार हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गवळी सर व अमोल गायकवाड यांनी केले. तर आभार फिरोज भालदार यांनी मानले .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख