बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्स मध्ये गोळीबार करून जबरी चोरी करणारे आरोपीपैकी २ आरोपी ३६ तासात जेरबंद ‘ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.

क्राईम

प्रतिनिधी –

दि. 08.06.2023 रोजी दुपारी 02.00 वा. चे सुमारास कोल्हापूर ते गगनबावडा जाणारे रोडवर बालिंगा, ता. करवीर, जि. कोल्हापूर गावचे हददीत असले कात्यायनी ज्वेलर्स दुकानात चार चोरट्यांनी घुसून त्यांच्या जवळ असले पिस्टलने गोळीबार करून व पिस्टलचा धाक दाखवून दुकानामध्ये असलेल्या लाकडी बेसबॉलच्या स्टिकने फिर्यादी रमेश शंकर माळी यांचे डोकीत मारून फिर्यादीस खाली पाडून शिवीगाळ करून लाथांनी मारहाण केली. तसेच दुकानात हजर असलेला फिर्यादी यांचा मेहुणा जितेंद्र माळी यास देखील बेसबॉलच्या स्टिकने कपाळावर मारहाण करून त्या अनोळखी इसमापैकी अंगात पांढया रंगचा शर्ट परिधान केलेल्या चोरट्याने फिर्यादी यांचे मेहुण्याच्या डावे पायाच्या जांघेत पिस्टलने गोळी मारून त्यास गंभीर जखमी केले. तसेच त्याने त्याचे सोबत आणलेल्या पांढया रंगाचे पोत्यामध्ये फिर्यादी यांचे दुकानातील अंदाचे सव्वा तीन किलो वजनाचे सोन्याचे दागिने व 1,50,000/- रूपये रोख रक्कम असा एकूण मिळून 2,06,84,850/- रूपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांचे संमतीशिवाय चवरी चोरी करून चौघेही चोरटे फिर्यादीचे ज्वेलर्स दुकानाच्या दारात लावलेल्या दोन मोटर सायकलीवरून निघून गेले. म्हणून फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून करवीर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 406/2023, [.द.वि.स. क. 397,324, 323, 504, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3.25 अन्वये गुन्हा दाखल आहे.

दुपारी 02.00 वा. चे सुमारास भर वस्तीत सदरचा गंभीर गुन्हा घडलेने गुन्ह्याचे घटनास्थळी मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग श्री. संकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महादवे वाघमोडे तसेच करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याची माहिती घेतली.

सदरचा गंभीर गुन्हा दाखल झालेने सोनार वर्ग तसेच जनमाणसात भितीचे वातावरण निर्माण झाले. सदर गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापूर परिक्षेत्र, श्री. सुनिल फुलारी तसेच मा. पोलीस अधीक्षक सो, कोल्हापूर श्री. महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर व करवीर पोलीस ठाणे कडील वेगवेगळी तपास पथके तयार करून त्यांना घटनास्थळावरील तसेच आजूबाजूचे परिसरातील सीसीटिव्ही फुटेज, रेकॉर्डवरील आरोपी चेक करून तसेच तांत्रिकदृष्ट्या तपास करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपींचा छडा लावून त्यांना सदर गुन्ह्यातील चोरीस गेले मुद्देमालासह ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणणे करीता योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.

मा. वरीष्ठांनी केले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे व शेष मोरे यांची तपास पथके तयार केली. सदर पथकांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून तसेच घटनास्थळाचे व आजूबाजूचे परिसरातील सीसीटिव्ही फुटेज द्वारे व तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला.

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील तपास पथकांमार्फत सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना श्री. महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांना खात्रीशिर माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी विशाल वरेकर, रा. कोपार्डे व सोनार सतिश पोहाळकर यांनी त्यांचे स्थानिक व परराज्यातील साथीदार आरोपींसोबत मिळून केला असून ते दोघे आरोपी विशाल वरेकर, रा. कोपार्डे याचे घरी आले आहेत. म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे दोन पंचासह आरोपी विशाल वरेकर यांचे कोपार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील घरी जावून छापा टाकला असता आरोपी नामे विशाल धनाजी वरेकर, व. व. 32, रा. आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल जवळ, कोपार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर व सतिश सखाराम पोहाळकर, व. व. 37. रा. कणेरकर नगर, रिंगरोड, फुलेवाडी, कोल्हापूर यांना पकडून त्यांचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता त्यांनी यातील एक स्थानिक व चार परराज्यातील आरोपीचे मदतीने कात्यायनी ज्वेलर्स, बालिंगा, ता. करवीर येथे दि.08.06.2023 रोजी कट रचून सदरचा गुन्हा केला असलेची कबुली दिली आहे. तसेच आरोपी विशाल वरेकर याचे माहितीने त्याचे घरातून त्यांनी सदर गुन्ह्यातील जबरदस्तीने चोरून नेले सोन्याचे दागिन्यांपैकी 367 ग्रॅम वजनाचे 22,38,700 /- रूपये किंमतीचे सोन्याचे व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी स्वीफ्ट डिझायर गाडी व अॅक्टीव्हा मोपेड असा एकूण 29,88,700/- रूपये किंमतीचा मुददेमाल गुन्ह्याचे तपासकामी जप्त केलेला आहे. सदरचे दागिने अटक आरोपींनी सदर चोरीतून त्यांचे वाट्यास आले असल्याचे सांगितले. आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील चोरीस गेलेले उर्वरीत दागिने परराज्यातील आरोपी घेवून गेले असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

सदर ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी विशाल वरेकर हा यापुर्वी जुना राजवाडा पोलीस ठाणे कडील फसवणुकीचे गुन्ह्यामध्ये कळंबा जेलमध्ये असताना एका परराज्यातील आरोपीशी मैत्री झाली होती. त्याचे सदर आरोपी मार्च-2023 मध्ये जेलमधून सुटलेनंतर एकमेकांचे संपर्कात होते. या दोघांनी मे 2023 चे शेवटच्या आठवड्यात गुन्ह्याचा कट रचला. त्याप्रमाणे परराज्यातून चार आरोपी हे आरोपी विशाल वरेकर याचे घरी राहणेस आले. विशाल वरेकर व सदर आरोपींनी दिनांक 03 ते 05 जून चे दरम्यान कात्यायनी ज्वेलर्सची रेखी करून पुर्व तयारी केली. दरम्यान आरोपी सतिश पोहाळकर याचे मदतीने कोल्हापूर मधील स्वीफ्ट डिझायर गाडी क्र. एमएच-43-डी-9210 चार दिवसाकरीता भाड्याने घेतली. सतिश पोहाळकर याचे आंबिका ज्वेलर्स 2011 पासून ते 2021 पर्यंत बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्स समोर होते. सध्या आबिका ज्वेलर्स, रंकाळा बसस्टॅण्ड येथे तो काम करतो. त्यामुळे तो ही हव्यासापोटी सदर कटात सहभागी झाला. दरम्यान सदर घटना करणेकरीता जुना राजवाडा व राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील दोन पल्सर मोटर सायकली चोरून आरोपी सतिश पोहाळकर याचे कणेरकरनगर, फुलेवाडी येथील घरी लपवून ठेवल्या होत्या. सदर घटनेनंतर आरोपी सतिश पोहाळकर व वरेकर यांनी परराज्यातील आरोपींना कात्रज पुणे येथे सोडून आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परराज्यातील आरोपींचे शोध करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील वेगवेगळी शोध पथके रवाना करणेत आली आहेत.

सदरची कारवाई मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो कोल्हापूर परिक्षेत्र, श्री. सुनिल फुलारी, मा. पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर, श्री. महेंद्र पंडीत, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, श्रीमती जयश्री देसाई व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो करवीर विभाग, श्री. संकेत गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, विनायक सपाटे, शेष मोरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महादेव कुहाडे तसेच । पोलीस अंमलदार वसंत पिंगळे, रणजित कांबळे, रणजित पाटील, संजय हुंबे, संजय कुंभार, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, अजय वाडेकर, ओंकार परब, अमर वासुदेव, सचिन देसाई, अमर आडुळकर, प्रशांत कांबळे, विनोद चौगुले, सागर कांडगावे, अमित सर्जे, प्रितम मिठारी, सागर माने, युवराज पाटील, नवनाथ कदम, संदीप गायकवाड, राजू कांबळे, प्रविण पाटील, आयुब गडकरी, विलास किरोळकर, नामदेव यादव, अनिल पास्ते, संतोष पाटील, अनिल जाधव, रफिक आवळकर, राजेंद्र वरंडेकर व स्वाती झुगर यांनी केली आहे.