श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत येथे विद्यालयाचा वर्धापन दिन साजरा…..

माझा जिल्हा

प्रतिनिधी

निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान निंबुतचे अध्यक्ष, मा.श्री. सतीशभैय्या काकडे दे. यांनी निंबुत पंचक्रोशीतील गरीब व होतकरू विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला पडू नये यासाठी२१ जून १९९९ रोजी श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत ची स्थापना केली. व खऱ्या अर्थाने निंबुत परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली.

विद्यालयाचा वर्धापन दिन आज दिनांक २१जून २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यालय स्थापने पाठीमागे मा. श्री. सतीशभैय्या काकडे देशमुख यांचा उद्देश स्पष्ट केला व विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या..

विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असणारे संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. भीमराव बनसोडे सर व संस्थेचे मानद सचिव मा. श्री. मदनराव काकडे दे. यांच्या हस्ते सहकारमहर्षी कै. बाबालालजी काकडे दे. यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थित मान्यवर तसेच विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधी यांनी केक कापला.. संस्थेच्या वतीने यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यालयातील इयत्ता ८ वी मधील विद्यार्थिनी कु. पोटे दिक्षा महेश हिने आपले मनोगत व्यक्त केले…
संस्थेचे उपाध्यक्ष मा.भीमराव बनसोडे सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विचार मांडले व विद्यालय स्थापनेपासून विद्यालयाने सर्व क्षेत्रातील केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले . संस्थेचे मानद सचिव माननीय श्री.मदनराव काकडे दे.यांनी विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीबद्दल विद्यार्थी व विद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग यांचे
अभिनंदन केले.संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतिशभैय्या काकडे दे. यांनी विद्यालयाच्या यशस्वी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राजाराम भगत सर यांनी केले व आभार श्री.विजय सूर्यवंशी सर यांनी मानले..