जुबिलंट कंपनीच्या अधिकाऱ्यांची माणुसकी हरवली आहे का?

माझा जिल्हा

 संपादक मधुकर बनसोडे.

 आज नींबूत नजीक लक्ष्मी नगर येथे दोन टू व्हीलरची समोरासमोर धडक होऊन मुरूम येथील दोघेजण तर नींबूच छप्री येथील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

 मुरूम येथील कुंभार या महिलेस हात पाय व डोक्यास मोठ्या प्रमाणात इजा झालेली असून स्थानिक युवकांनी जखमींना रस्त्याच्या एका बाजूला घेऊन ॲम्बुलन्स बोलावण्यासाठी धावपळ सुरू केली. गर्दीतीलच एकाने जुबिलन्ट कंपनी मध्ये फोन करून सदर घटनेची माहिती देऊन ॲम्बुलन्स त्वरित मिळावी यासाठी विनंती केली मात्र नेहमीप्रमाणेच उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली अशी चर्चा त्या गर्दीतील युवकांकडून केली जात होती.

 निंबुत येथील काही युवक कंपनी गेट वरती देखील गेले असता त्यांना ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली नाही. अशी देखील चर्चा स्थानिक युवकांमधून होत आहे खरंच जुबलंट कंपनीतील अधिकाऱ्यांची माणुसकी षंढ झाली आहे का? अपघातग्रस्त यांना त्वरित उपचार मिळावा यासाठीच स्थानिक युवकांकडून कंपनीत ऍम्ब्युलन्सची मागणी केली जात होती तरीदेखील कंपनीकडून वेळेत ॲम्बुलन्स का उपलब्ध झाली नाही? याची चर्चा स्थानिक युवकांमधून होत आहे जवळपास अर्धा तास अपघातग्रस्त रस्त्याच्या एका बाजूला बसवून ठेवले होते.

 नक्की कोण अधिकारी आहे जो अशा घटनांसाठी ॲम्बुलन्स देण्यासाठी टाळाटाळ करत आहे? कंपनीला नक्की काय अडचण आहे? अनेक वेळा स्थानिक ठिकाणी अपघात झाल्यास कंपनीकडे ॲम्बुलन्ससाठी मागणी केली असता कंपनी ॲम्बुलन्स देण्यासाठी टाळाटाळच करत असते असे देखील स्थानिकांमधून बोलले जात आहे. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेलार साहेब व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेऊन प्रहार संघटनेच्या ॲम्बुलन्स मधून वाघळवाडी येथील साई सेवा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी अपघातग्रस्तांना पाठवले आहे.

 मात्र या सर्व घटनाानंतर स्थानिकांमधून कंपनीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत. शेजारीच कंपनी मध्ये एम्बुलेंस सेवा असून सुद्धा कंपनी करत आहे का दिखावा? शेजारीच कंपनी असून खोळंबा नसून शिमगा. लवकरच कंपनीच्या चुकीच्या धोरणा विरोधात युवक जन आक्रोश आंदोलन करणार असल्याची कुजबुज स्थानिकांमधून होत आहे.