राज्यात २२ ते २४ जुलै दरम्यान अतिवृष्टीची शक्यता

माझा जिल्हा

प्रतिनिधी

नागपूर : उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओडीशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पाऊस पडत असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

आज नाशिक, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, नागपूर , वर्धा अकोला, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर २२ ते २४ जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्राला येते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात विविध जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे दाणादाण उडाली. पुढील २४ तासांत पालघर, रायगड, ठाणे, सातारा आणि पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी हिंगोली येथे वादळी वाऱ्यासह मुसळधारांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.