• Home
  • माझा जिल्हा
  • गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तीन दिवस मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद
Image

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तीन दिवस मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद

प्रतिनिधी

गणेशोत्सव कालावधीत शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती १९ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद राहतील. तसेच २९ सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिका क्षेत्रात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ मधील नियम – १४२ अन्वये किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती (एफएल-२, एफएल-३, सीएल-३, एफएलबीआर-२, फॉर्म-ई, फॉर्म-ई-२ व ट. ड.-१ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १९ सप्टेंबर व २८ सप्टेंबर दोन्ही पूर्ण दिवस पूर्ण पुणे जिल्हा, २९ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती तसेच गणेशोत्सवाचा पाचवा व सातवा संपूर्ण दिवस ज्या भागात पाचव्या व सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते अशा भागातील अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात. याशिवाय ज्या-ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका असेल, त्या-त्या ठिकाणी विसर्जन मिरवणुक मार्गावरील सर्व भागातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद ठेवाव्यात. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ व त्याअंतर्गत असलेल्या नियमातील तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Releated Posts

सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

प्रतिनिधी सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.…

ByBymnewsmarathi Jul 19, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026