मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 1 September 2026

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंती निमित्त प्रशासनाकडून अभिवादन*

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 18, 2023 1 मिनिट वाचन 8,510 वाचन

प्रतिनिधी.

बारामती दि.१८: माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांना जयंती निमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी तहसिल कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्ताने श्री. नावडकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना प्रतिज्ञा दिली.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे, स्वाती गायकवाड यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख