प्रतिनिधी
बारामती : विकसित बारामती शहरात जाणूनबुजून झोपडपट्ट्या,मागासवर्गीय दलित वस्ती या ठिकाणी विकास केला जात नाही का?आम्हाला आमच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले जात आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. आमच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागले तरी आम्ही आंदोलन करून आमच्या मागण्या मान्य करून घेऊ.सार्वजनिक शौचालय बांधून मिळावे या मागणीसाठी वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करून देखील पान गल्ली येथील नागरिकांना सार्वजनिक शौचालय बांधून मिळालेले नाही.म्हणून सदर प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी बारामती शहरातील गुणवडी चौक येथे दिनांक 25/08/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता जाहीर निषेध सभा आयोजित केली आहे.
काल मा.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पत्रकारांशी बोलताना म्हणाले बारामती मुळे मी इथपर्यंत आलो आहे.त्याच बारामती करांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे दादांचे कर्तव्य आहे.कधी पर्यंत बारामती कर समस्या सांगण्यासाठी जनता दरबराची वाट बघणार?कधी तरी जनतेच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या.जर तुम्हाला जाता येत नाही कमीत कमी तुमचे पदाधिकारी कार्यकर्ते तरी पाठवा? दादा बारामतीत आल्यावर पहाटे पांढरी कपडे घालून पुढे पुढे करणारी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांच्या अडचणी सोडवायला पुढे येताना दिसत नाही.आम्ही निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना फोन केला की थोड्या वेळात भेटू आता बाहेर आहे असे ऐकायला मिळते.
*विकास कामाची पाहणी करताना कधी तरी झोपडपट्टी दलित वस्तीची पण पाहणी दादांनी केली पाहिजे.*
सदर जाहीर निषेध सभेबाबत मा.अजितदादा पवार सो उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.मुख्याधिकारी सो,बारामती नगर परिषद,उपविभागीय पोलीस अधिकारी सो,बारामती,मा.पोलीस निरीक्षक सो बारामती शहर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे.जाहीर निषेध सभेचे समस्त पानगल्ली येथील रहिवासी, होलार समाज यंग ब्रिगेड महाराष्ट्र राज्य,भारतीय युवा पँथर संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आयोजन केले आहे.