प्रतिनिधी.
”कोंढाणा आणि स्वराज्यात
लावतो प्राणांची बाजी
शब्द असे, मातोश्री अन राजं
सांगती सुभेदार तानाजी”
श्री. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे ( सुभेदार चित्रपट निर्माते,संस्थापक अध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ) आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट 25 ऑगस्टला महाराष्ट्रात,तसेच देशाच्या अनेक भागांमध्ये शिवाय या निमित्ताने भारतासह सात देशात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे. ‘सुभेदार’
चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर, गाण्यांमधून प्रेक्षकांची उत्सुकता याआधीच शिगेला पोहचली आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रम सोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्य,कुटुंबाने दिलेली तितकीच मोलाची साथ दर्शन ‘सुभेदार’ चित्रपटात होणार आहे.या चित्रपटासाठी बारामती मधून श्री प्रदीप ढुके संस्थापक अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान ,मावळा जवान संघटना बारामती,सौ.अर्चनाताई सातव अध्यक्षा हनुमान नगर महिला बचत गट बारामती,शेखर जाधव,प्रकाश सातव,अश्विनीकुमार पतकी,रमेश मरळ-देशमुख,बाळासाहेब घाडगे, अर्चना ढुके,दिपाली जाधव,अमिता पतकी,आर्या पतकी, जन्मेजयराजे ढुके,यांनी शुभेच्छा दिल्या.