प्रतिनिधी.
मुंढवा ब्रिज परिसरात ०८ वर्षाचा मुलगा एकटाच अनवानी अस्वस्थ भटकत असून तो रडत असल्याने रोडने जाणा-या चालक नागे अतिश विठ्ठल जगदाळे, वय २८ वर्षे, साईनाथ नगर वडगाव शेरी, पुणे यानी त्यास मुंढवा पोलीस ठाण्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने घेवून आले. त्यांनी सदर मुलास ठाणे अंमलदार सहा. पोलीस फौजदार, होले यांचे ताब्यात दिले होले यांनी त्यांचे मदतीस असलेल्या महिला अंमलदार उमा चोरघे यांचे मदतीने मुलाकडे प्रेमाने विचारपुस केली. परंतू त्यास काहीएक सांगता येत नसल्याने त्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे यांचेसमोर नेले.
सदर घटनेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे यांनी गाभीर्यपूर्वक दखल घेवून तात्काळ
त्याचे आई-वडील व नातेवाईक यांचा शोध घेणे करीता पोलीस अंमलदार मुंढवा बिट मार्शलवरील पोलीस
अमलदर सचिन मेमाणे, संदीप गर्जे यांना मुंढवा चौक, खराडी ब्रिज भागातील लेबर कॅम्प, बिगारी,
पथारीवाले, फुगे विक्रेते यांना फोटो दाखवून खात्री करणे बाबत सुचना दिल्या. तसेच त्याप्रमाणे नागरिक,
पोलीस, पत्रकार अशा व्हॉटसअप ग्रुपवर सदरचा मुलागा मिळून आला असले बाबत त्याचे आई-वडीलांचा
शोध होणेकामी ब्रॉडकास्ट करण्यात आला.
सदरचा मुलगा भारती विद्यापीठ, कात्रज चौक भागातील असल्याची माहिती मिळाल्याने त्याचे पालकास मुंढवा पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले. पोलीसांचे शोध मोहीम व पोलीस चौकस यंत्रणेचा योग्य वापर करून अंदाजे दोन तासांनी सदर मुलाचे आई वडीलांचा शोध घेणेस पोलीसांना यश मिळाले.
सदर मुलाचे नाव संजय पवार, वय ०८ वर्षे, रा. भारती विद्यापीठ, कात्रज, पुणे चौकातील अत्यंत
गरीब कुटूंबातील फुटपाथवर राहून फुगे व इतर वस्तूंची विक्री करणा-या लोकांचा असल्याचे समोर आले.
सदर मुलास त्याची आई आशा पवार, रा. सदर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत सदर
परिसरातील नागरिकांनी पोलीसांचे या तत्पर कामगिरी बद्दल कौतुक केले आहे.
सदरची कामगिरी, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख मा. राहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विष्णू ताम्हाणे यांचे सुचानाप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक, अश्विनी भोराले सहा. पोलीस फौजदार, होले, पोलीस अंमलदार, सचिन मेमाणे, नवनाथ कोकरे, उमा चोरघे आरती जमाले च इतर स्टाफ यांनी केली आहे